आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक अजय रामटेकेंवर हल्ला करणार्‍यांची गय नाही - वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रवादीचे नगरसेवक रामटेके यांच्यावर दुसर्‍यांदा प्राणघातक हल्ला होणे, ही पोलिस दलाला शोभणारी बाब नाही. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दलाने दक्ष राहावे, हल्ला करणार्‍यांच्या पाठीशी कुणीही असले, तरी त्यांची गय केल्या जाणार नाही, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले. प्रकरणाचे धागेदारे लवकर शोधा, असे सांगत त्यांनी पोलिस अधीक्षकांना धारेवर धरले.
आव्हाड हे सर्वप्रथम रामटेके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते होते. रामटेके यांच्याकडून त्यांनी हल्ल्याविषयी माहिती जाणून घेतली. नगरसेवकावर दोनदा प्राणघातक हल्ला होतोच कसा, याविषयी त्यांनी चिंता व्यक्त करून पोलिसांना धारेवर धरले. या वेळी रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार भारत राक्षसकर उपस्थित होते. त्यांच्याकडून त्यांनी हल्लेखोरांविषयी माहिती घेतली. हल्लेखोरांच्या पाठीमागे ज्या शक्ती असतील, त्यांना उखडून काढण्याचे आदेश दिले.
तसेच या हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याचेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांना जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अवगत केले. त्यावर चिडून जाऊन, त्यांनी पोलिस अधीक्षकांना धारेवर धरले. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे, प्रदेश सचिव सीमांत तायडे, ऋषिकेश पोहरे, नीरज खोसला, महानगराध्यक्ष अजय तापडिया, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, बुढन गाडेकर, रवि गीते, आशीष सावळे आदींची उपस्थिती होती.
सहावा आरोपी मी शोधू का?
नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील हल्लाप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार भारत राक्षसकार यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारणा केली. त्यावर ठाणेदार म्हणाले, साहेब! पाच आरोपी पकडले आहेत. एक आरोपी बाकी आहे. त्यावर आव्हाड संतापून म्हणाले की, आरोपी लवकर शोधा, नाही तर मी शोधू का सहावा आरोपी, असे म्हणून त्यांनी ठाणेदारांची फिरकी घेतली.
जिल्हय़ातील पोलिसांवर मंत्री महोदय नाराज
जिल्हय़ात लुटमार, मारामार्‍या आणि दरोड्याच्या वाढत्या घटनांसंबंधीची माहिती कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर घातली. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांचा आव्हाड यांनी वर्ग घेतला. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात गांभीर्याने घेण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. गृहमंत्री. आर. आर. पाटील यांना जिल्हय़ातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात कळवण्यात येईल, असे म्हणून त्यांनी जिल्हा पोलिस दलावर नाराजी व्यक्त केली.