आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांनी वाचला पोलिसांच्या अपमानास्पद वागणुकीचा पाढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देताना जिल्ह्यातील पत्रकारबांधव.
अकोला - पोलिस पत्रकारांनी एकत्र येऊन काम केले तर समाजातील अपप्रवृत्ती डोके वर काढणार नाही. परंतु, पोलिसच जर पत्रकारांशी अपमानास्पद अरेरावीने वागले तर समाजात न्यायाची भूमिका पोलिसांकडून ठेवता येणार नाही, असा प्रश्न उपस्थित करून अकोला पोलिसांच्या मनमानीचा अपमानास्पद वागणुकीचा पाढा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे वाचला. तीन दिवसांत ठोस कारवाई करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

आज, शनिवारी दुपारी अकोल्यातील पत्रकारांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना घेराव घालून पोलिसांच्या अपमानास्पद वागणुकीची इत्थंभूत माहिती दिली. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे ठाणेदार डी. डी. ढाकणे यांनी क्राइम रिपोर्टर विठ्ठल महल्ले पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. ग्रामीण पत्रकार सचिन मुर्तडकर चान्नी येथील वार्ताहर किर्तने या दोघांसोबत पोलिसांनी तसेच वर्तन करून मुर्तडकर यांच्यावर गुन्हे दाखल केले. अक्षयतृतीयेच्या दिवशी अकोल्यातील भांडपुरा चौकात दगडफेक झाली. वृत्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्राॅनिक मीडियाचे पत्रकार जयेश जग्गड यांचा कॅमेरा जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी हिसकावून घेत अशोभनीय भाषा वापरून अपमान केला. या सर्व बाबींची दखल घेऊन पोलिसांना समज द्यावी अन्यथा पत्रकार आक्रमक होतील, असा इशाराही या वेळी उपस्थित पत्रकारांनी दिला. या वेळी बहुजन पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्राॅनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी अॅड. सुधाकर खुमकर, राजू ओढे, अजय डांगे, विठ्ठल महल्ले, अनिल माहोरे, पंकज जायले, दिलीप ब्राम्हणे, संजय खांडेकर, उमेश अलोने, जयेश जग्गड, धनंजय साबळे, सचिन मुर्तडकर, संजय अलाट, सुरेश राठोड, मधुसूदन कुळकर्णी, अनंत गावंडे, नरेंद्र शर्मा, योगेश फरपट, संतोष येलकर, मुकुंद पाठक, पद्माकर आखरे, पी. एल. सिरसाट, संदीप पांडव, अनिल सिरसाट, जीवन साेनटक्के, प्रबोध देशपांडे, नीलेश जोशी, प्रमोद लाजुरकर, दिनेश शुक्ला, नीलेश पोटे, शंतनू राऊत, गणेश मापारी, सुनील सावरकर, जयकुमार मिश्रा यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...