आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' चार आरोपींना न्यायालयीन कोठडी, आलेगाव क्षेत्रात आढळला होता मृत बिबट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला / पातूर- पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या आलेगाव वनक्षेत्रातील चोंढी ते जांबलगतच्या परिसरात फेब्रुवारीला बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आज १२ फेब्रुवारीला वन कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारून २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
फूट लांबीच्या या मृत बिबट्याच्या अंगावर अनेक जखमा तथा पायाची नखे गहाळ होती, त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त होत होता. दरम्यान, रानडुक्कर, काळवीट आदींच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर श्रीराम लढाड, बजरंग भोईर (रा. जांब) तसेच मधुकर ससाणे महम्मद इस्माइल यांना १० फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यांना दिवाणी फौजदारी न्यायालय, प्रथम श्रेणी पातूर येथे हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली होती. आज न्यायालयाने त्यांचा जामिनाचा अर्ज नाकारून २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात उपवनसंरक्षक पी. आय. लोणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक जयंत तराळे, पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन देशमुख, श्री शेगोकार, श्री खंडारे, श्री तायडे, श्री शिरभाते, मानद् वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर आदींनी काम पाहिले.