आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील तरुणींची मिळतेय ‘जम्प सूट’ला पसंती; शिफॉन, ट्रान्झी आणि होजिअरी या फॅब्रिकमध्ये हे ड्रेस उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - धूम-3 मधील ‘कमली कमली’ या गाण्यात कॅटरिना कैफ हिने घातलेल्या ड्रेसला सध्या तरुणींची पहिली पसंती मिळत आहे. कॉलेजला सुरुवात होत आहे तसे बाजारात दाखल झालेल्या नवीन फॅशनकडे तरुणाई आकर्षित होत आहे. अखंड अशा या ‘जम्प सूट’ची तरुणींमध्ये धूम असलेली दिसून येत आहे.

फॅशन जगतात होत असलेल्या बदलांकडे तरुणाईचे लक्ष असते. जीन्स आणि टॉप, कॅज्युअल पॅन्ट आणि टॉप याला जम्प सूट हा एक चांगला पर्याय आहे. जम्प सूटलाच पॅडलदेखील म्हणतात. दिसायला जरी हे पॅन्ट आणि टॉप वाटत असले, तरी ते अखंड असते. यात फूल आणि थ्रीफोर्थ असे दोन्ही प्रकार आहेत. शिफॉन, ट्रान्झी आणि होजिअरी या फॅब्रिकमध्ये हे ड्रेस असल्याने पावसाळ्यात वापरण्यास उत्तम आहेत. आॅफिस वेअर म्हणून फारसे वापरता येत नसले तरी कॉलेज गोइंग तरुणींसाठी तसेच एक चेन्ज म्हणून वापरण्यास चांगला पर्याय आहे. फूल लेन्थ असलेले पॅडलचे दर 1500 ते 1700 रुपये आहे, तर थ्रीफोर्थ 1200 ते 1400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशनचे वेड
जम्प सूट जवळपास सगळ्या रंगात असले तरी ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशनचे तरुणींना वेड असलेले पाहायला मिळत आहे. फूल ब्लॅक, ब्लॅक अँड व्हाइट, ब्लॅक अँड ग्रे या कॉम्बिनेशनला तरुणी पसंती देत आहेत. विविध प्रिंटपैकी अ‍ॅनिमल प्रिंट आणि बार्बी डॉल प्रिंट तरुणींना आकर्षित करत आहे. अ‍ॅनिमल प्रिंटमध्ये लहान मोठे प्राण्यांचे डिझाइन पूर्ण ड्रेसवर पाहायला मिळतात. ड्रेसच्या खालच्या भागात म्हणजे पॅन्टमध्ये प्लाझो स्टाइलदेखील आहे. त्यालादेखील चांगली मागणी आहे.