आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Just Dial 102, Ambulance Direct Come To Preganant Woman Door

डायल 102; रुग्णवाहिका थेट गर्भवतींच्या दारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता 102 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध त्वरीत होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे.

वाहतुकीची सुविधा व आर्थिक अडचणीमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेचे केंद्रीय कार्यालय पुणे येथे राहणार असून, मे.हर्मन्स इंडिया या कंपनीकडे याचे व्यवस्थापनाचा कंत्राट देण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर या केंद्रीय सेवेचा शुभारंभ होत आहे. ही रुग्णवाहिका अत्याधुनिक राहणार असून, त्यामध्ये ऑक्सिजनचे सिलिंडर तसेच ती वातानुकूलित राहणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याकरिता 102 हा क्रमांक डायल केल्यानंतर फोन केंद्रीय संपर्क कक्षात जोडला जाईल. ज्या परिक्षेत्रातील रहिवासी असाल त्या परिक्षेत्रातील राष्ट्रीय रुग्णवाहिका गर्भवतींच्या व बालकांच्या सेवेकरिता उपलब्ध होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ठिकाणी या उपक्रमाचे जिल्हा संपर्क कक्ष स्थापन होईल.या कक्षांच्या माध्यमातून रुग्णांचा फायदा होणार आहे.


आणखी 15 रुग्णवाहिका होणार उपलब्ध
आपत्कालीन सेवासुविधेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हय़ाला 15 वातानुकूलित रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. कुठेही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास या रुग्णवाहिका उपलब्ध होतील. प्रत्येक अपघातप्रवणस्थळी या रुग्णवाहिका उभ्या राहणार आहेत. 108 क्रमांक डायल केल्यास त्या उपलब्ध होणार आहेत.


माता मृत्यू रोखणे उद्दिष्ट
जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. माता मृत्यू व बाल मृत्यूदर रोखणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, ’’ डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका