आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांबळे हत्याप्रकरणी नऊ आरोपी कारागृहात, एक आरोपी अद्यापही फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जुने शहरातील दीपक कांबळे हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
मुलांच्या वादातून ४५ वर्षीय दीपक वामन कांबळे यांची त्यांच्या घरी शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या गुंडाच्या टोळक्याने कोयता कुऱ्हाडीने मारून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यापैकी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आरोपींनी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेले शस्त्रे आणि कपडे दिले आहेत. २३ मे रोजी या आरोपींची पोलिस कोठडी संपल्यामुळे जुने शहर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. या वेळी आरोपीच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला. सरकार पक्ष आरोपीची बाजू ऐकून न्यायालयाने मुख्य अारोपी मनीष सिरसाट, दीपक समाधान सिरसाट, अजय प्रभू सावळे, अमर प्रभू सावळे, अल्पेश अजने, आशिष पंजाबराव अजने, सोनू जाधव या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. अमोल सिरसाट, अॅड. देहलीवाले, अॅड. सुमेध वानखडे, अॅड. मोहन सरदार, अॅड. जाधव यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...