आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kartiki Joshi Murder Case News In Marathi, Rajeshs Kale, Divya Marathi

कार्तिक जोशी खून प्रकरणी काळेसह 12 जणांना आत्मसर्मपणाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - येथील महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव नगरसेवक राजेश काळेसह त्याच्या 12 साथीदारांवर कार्तिक जोशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्याआधारे पोलिसांनी त्यांना गत वर्षी अटक केली होती. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने मंगळवारी हा जामीन रद्द ठरवत काळे याच्यासह इतर 12 जणांना सात दिवसांच्या आत आत्मसर्मपण करण्याचे आदेश दिलेत.


कार्तिकचे काका संजय मदनलाल जोशी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राजेश काळेसह 12 जणांना अटक केली होती. काळे आणि त्याच्या 12 साथीदारांनी कार्तिकला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असा या सर्वांवर आरोप आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, याविरुद्ध संजय जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहदाद मागितली. मंगळवारी नागपूर उच्च न्यायालयाने या सर्वांचा जामीन रद्द करून त्यांनी सात दिवसांच्या आत न्यायालयासमोर आत्मसर्मपण करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे वरिष्ठ अधिवक्ते अनिल मार्डीकर आणि सत्यनारायण जोशी हे काम पाहत आहेत.


नेमके काय घडले होते? : नगरसेवक काळेसह 12 सहकार्‍यांनी 21 मे 2013 ला पूर्ववैमनस्यातून कार्तिकला मारहाण केली. त्यात कार्तिक हा जखमी झाला होता. उपचारादरम्यान, 25 मे रोजी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार्तिकच्या काकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काळेसह त्याच्या 12 साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, 26 मे रोजी यातील सहा जणांना अटक केली होती, तर काळे हा फरार झाला होता. पुढे पाच दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.