आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- जिल्ह्यातील एकमेव वन्यजीव अभयारण्य असलेल्या काटेपूर्णात नुकतीच ‘ट्रान्झिटलाइन’ पद्धतीने प्रगणना झाली असून प्राथमिक अहवालानुसार 415 वन्यजीवांचे अस्तित्व येथे आढळून आले आहे. यात बिबटे आठ व अस्वलांची संख्या सात आढळली आहे.
काटेपूर्णा अभयारण्यात 16 ते 24 जानेवारीदरम्यान वन्यजीव अधिवास व वन्यजीवांची प्रगणना ट्रान्झिटलाइन पद्धतीने करण्यात आली. अभयारण्यातील कासमार, वनोजा, येडशी, फेट्रा, पिंपळशेंडा या पाचही बीटमधून वनाधिकार्यांसह कृषी विद्यापीठातील वनविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पाचही बीटचा अहवाल संकलित झाल्यानंतर अकोला वन्यजीव विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार येथे 415 वन्यजीवांचे अस्तित्व आहे. तसेच अभयारण्यात राबविण्यात आलेल्या गवताळ माळरान योजनेचा चांगला लाभ झाला असून तृणभक्षींची संख्या वाढण्यास त्यामुळे मदत होणार असल्याचे काटेपूर्णा अभयारण्य सल्लागार समितीचे सदस्य गोविंद पांडे यांनी बोलताना सांगितले. अभयारण्यात पांढरा कुसळ, डोंगरी, मारवेल, पवन्या, देवधान, शेंडा, चित्ता या खाद्य गवत प्रजाती विपुल प्रमाणात आढळल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.