आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा येथे दोन बहिणींनी अट्टल चोराला धाडले यमसदनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-काटेपूर्णा येथील दोन महिलांनी चेतन भुतडा या कुख्यात चोरट्याची मंगळवारी मध्यरात्री काठीने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी महानंदा भुतडा, तिची बहीण पद्मा भिवटे या दोघींना बोरगाव मंजू पोलिसांनी 29 जानेवारीला अटक केली.
काटेपूर्णा येथील नवीन वस्तीत राहणारा चेतन भुतडा (35) हा महानंदा नावाच्या महिलेसोबत राहायचा. चेतन नेहमी चोर्‍या करायचा तसेच दारू पिऊन महानंदाला मारहाण करायचा. 28 जानेवारीला रात्री तो दारू पिऊन घरी आला. त्याच्याजवळ चोरलेले साहित्य होते. महानंदाने विचारणा केली असता चेतनने तिला बेदम मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला. महानंदाची बहीण पद्मादेखील घरी होती. दोघींनी प्रतिकार करत चेतनच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला व काठीने मारहाण केली. मारहाणीत चेतनचा घटनास्थळी मृत्यू झाला.
श्वानाने घेतली आरोपींच्या अंगावर उडी
चेतन भुतडाची हत्या केल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दोन्ही बहिणींनी केली होती. मात्र, बोरगाव मंजू पोलिसांना घातपात असल्याचा संशय आल्याने श्वानास पाचारण केले. श्वानाने वास घेतल्यावर आरोपींच्या अंगावर उडी घेतल्याने हत्येचा तिढा सुटला.
आरोपी अटकेत
हत्येची माहिती मिळाल्यावर बोरगाव पोलिस कोटपूर्णा येथे दाखल झाले. हत्येसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले. दोन्ही महिला आरोपींना अटक केली असून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. शंकर शेळके, ठाणेदार, बोरगाव मंजू