आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मोर्णा’तील पाणी आरक्षणाकडे दुर्लक्ष, काटेपूर्णा प्रकल्पात वर्षाकाठी विविध योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात अद्यापही ५० टक्के जलसाठा उपलब्ध झालेला नाही. या प्रकल्पातून अकोला शहरासह विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मोर्णा प्रकल्पातील पाच दशलक्ष घनमीटर आरक्षित पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात एकूण ३३ जलप्रकल्प आहेत, परंतु उलाढालीसह जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागवण्याची मदार मात्र काटेपूर्णा प्रकल्पावरच आहे. या वर्षी पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यात एकूण साठवण क्षमतेच्या ६१.७८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे, तर काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून केवळ अकोला शहरालाच पाणीपुरवठा केला जात नाही तर जिल्ह्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच सिंचनासाठीही पाणी दिल्या जाते. त्यामुळे या सर्व योजनांना पाणीपुरवठा केल्यास सिंचनासाठी केवळ आठ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या पाण्यातून अत्यल्प जमीन सिंचनाखाली येणार आहे.

पाणीपुरवठाविभागाने २५ सप्टेंबरला अवैध नळजोडणी शोधमोहिमेत मातानगर भागातील ५३ अवैध नळजोडण्या तोडल्या, तर दोन दिवसात एक लाख रुपयांचा महसूल वसूल केला. अवैध नळजोडणी मोहिमेत ३० सप्टेंबरपर्यंत एक हजार नळजोडण्या वैध करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे.

१८ सप्टेंबरपासून अवैध नळजोडणी मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ४५ अवैध नळजोडण्यांवर कारवाई करीत ३५ नळजोडण्यात तोडण्यात आल्या. त्यानंतर १९, २०, २२, २३ सप्टेंबरला अवैध नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली, तर २५ सप्टेंबरला या मोहिमेत मातानगर भागातील ५३ अवैध नळजोडण्या तोडण्यात आल्या. २४ २५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी एकूण तीन लाख रुपयांच्या डिमांड नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या धडक मोहिमेमुळे महापालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा असून, अवैध नळजोडण्या वैध होणार आहेत.
महानयेथील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पंपातील बिघाड दुरुस्त केल्यानंतर २४ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही, परंतु २५ सप्टेंबरला पाणीपुरवठा पूर्वपदावर आला. यामुळे पाणी वितरणाच्या वेळापत्रकात बदल झाला असून, २६ सप्टेंबरला झोन क्रमांक ला पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

सुधारित पाणी वितरणानुसार शुक्रवारी जय हिंद चौक, शिवाजीनगर, काळा मारुती परिसर, भीमनगर, शिवचरण पेठ, रामपीरनगर, शरीफनगर, श्रीवास्तव चौक, गायत्रीनगर, शिवसेना वसाहत, भारती प्लॉट, रेणुकानगर, अनंतनगर, सोपीनाथनगर, अयोध्यानगर, गोरक्षण रोड, आळशी प्लॉट, पोलिस मुख्यालय वसाहत, नीमवाडी, कैलास टेकडीचा काही भाग, कादरीपुरा, ताज चौक, रामदास मठ, इंदिरानगर, नायगाव, शंकरनगर, महेबूबनगर, शेलारफैल, विजयनगर, देशमुखफैल, युसूफ अली खदान, गौतमनगर, नित्यानंदनगर, सिद्धी विनायक नगर, आसरा कॉलनी, बसेरा कॉलनी, कपिलानगर, रणपिसेनगर, रामनगर अादी भागाला पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश काळे यांनी दिली