आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा प्रकल्पात फक्त ७.५५ दलघमी जलसाठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे जलप्रकल्पांच्या साठ्यात एक सेंटिमीटरनेही वाढ झाल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिक चिंतातुर झाला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ ७.५५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उरला आहे, तर उमा आणि दगडपारवा प्रकल्पांत अद्यापही मृतसाठाच आहे. पावसाने पुढे आणखी काही दिवस दांडी मारल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा, उमा या प्रकल्पांसोबतच ३२ लघू प्रकल्प आहेत. हे जल प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निर्गुणा वगळता इतर कोणत्याही प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे जून महिन्यापासून प्रकल्पांच्या जलसाठ्याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. जून महिन्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. शेतकरी काही प्रमाणात सुखावला, तर सर्वसामान्य नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. परंतु, जलप्रकल्पांच्या साठ्यात मात्र वाढ झाली नाही. काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्याचे १५ जुलैपर्यंत आरक्षण करण्यात आलेले आहे. त्यामुळे १५ जुलैपूर्वी जोरदार पाऊस होऊन प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास जिल्ह्याच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वान प्रकल्पात इतरांच्या तुलनेने अधिक जलसाठा उपलब्ध आहे. ८१.९५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पात तूर्तास ३२.१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील पाणीपुरवठा योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

- काटेपूर्णा प्रकल्प १०२ मिमी
- मोर्णा प्रकल्प १३६ मिमी
- निर्गुणा प्रकल्प २५६ मिमी
- उमा प्रकल्प १२१ मिमी
- दगडपारवा प्रकल्प १२५ मिमी
- वान प्रकल्प ६२ मिमी
- काटेपूर्णा -- ७.५५
- मोर्णा -- ७.५०
- निर्गुणा -५.५६
- उमा - मृतसाठा
- दगडपारवा - मृतसाठा
- उर्ध्व मोर्णा - १.१४
- जुलै २०११ - २६.०९ दलघमी
- जुलै २०१२ - ०.४० दलघमी
- जुलै २०१३ - ४६.९१ दलघमी
- जुलै २०१४ - २०.४५ द.घमी