आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात निर्विघ्न उत्सवासाठी तगडा बंदोबस्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कावड-पालखी उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदोबस्तामध्ये बुलडाणासह इतरही जिल्ह्यांतील पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत. कावड-पालखी मिरवणुकीला खर्‍या अर्थाने अकोट फैल परिसरातून सुरुवात होणार आहे. मिरवणूक शिवाजी पार्क, आकोट स्टॅँड, टिळकरोड, जुना कापड बाजार, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, राजेश्वर मंदिर या मार्गाने काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सहा झोन; 13 सेक्टर

मार्गावर वल्लभनगर फाटा ते शिवाजी पार्क, शिवाजी पार्क ते आकोट स्टॅँड, आकोट स्टॅँड ते हॉटेल देहलीवाला, हॉटेल देहलीवाला ते कापड बाजार, कापड बाजार ते शहर कोतवाली, महाराणा प्रताप चौक ते राजेश्वर मंदिर असे सहा झोन करण्यात आले आहेत. या सहा झोनमध्ये एकूण 13 सेक्टर तयार करण्यात आले आहेत.

28 फिक्स पॉइंट

मिरवणूक मार्गावर एकूण 28 फिक्स पॉइंट तयार करण्यात आले. 21 पॉइंट प्रत्यक्ष मिरवणूक मार्गावर तयार करण्यात आले असून, 7 पॉइंट मिरवणुकीच्या डाव्या बाजूने लावण्यात येणार आहेत.

नियमांचे पालन करा
मिरवणुकीमध्ये सर्वांनी शिस्त पाळावी. ध्वनीक्षेपकाच्या नियमांचे पालन करावे. वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मादक पदार्थ, द्रव्यांचे प्राशन करू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी संपर्क साधावा.
-अमरसिंह जाधव, पोलिस उपअधीक्षक

तणावाच्या घटना
कावड-पालखी मिरवणुकीत सन 2004 ते सन 2007 या कालावधी चार तणाव निर्माण करणार्‍या घटना घडल्या. 12 ऑगस्ट 2008मध्ये अकोट फैल परिसरात गुलाल उडाल्यावरून तणाव निर्माण झाला होता. 13 ऑगस्ट 2007मध्ये माणेक टॉकिजसमोर बसण्यावरून वाद झाला होता. 3 सप्टेंबर 2007मध्ये खिडकापुरा येथे दगडफेकीची घटना घडली होती.