आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश्वरनगरीत हर्र... बोला... जयघोष... तगडा बंदोबस्त- कावडयात्रा शांततेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्यावर्षी पातूर येथे कावडयात्रेला गालबोट लागले होते. त्या पृष्ठभूमीवर यंदा िजल्हा पाेलिसांनी कावड आणि पालखीमध्ये तगडा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कावडयात्रा शांततेत पार पडली.
कावडयात्रेच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोिलस अधीक्षक चंद्र किशाेर मीणा यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासंदर्भात आदेश दिले होते. सोमवारी सर्व पोिलस ठाण्याचे ठाणेदार, एपीआय, होमगार्ड यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी सकाळीच पोिलस अधीक्षक चंद्र िकशोर मीणा यांनी राजराजेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली होती तसेच उपविभागीय पोिलस अधिकारी गणेश गावडे यांच्या नेतृत्वामध्ये पोिलस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामदासपेठेत मानाच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर ठाणेदार सुधाकर देशमुख यांनी पालखीचे पूजन केले. ८५० पोिलस जवानांच्या बंदोबस्तात कावडयात्रा शांततेत पार पडली.

शहरातील वििवध महामार्गांवरून सोमवारी निघालेली कावड उत्सवाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. यामध्ये निरनिराळे देखावे, सामाजिक संदेश, डीजे, ढोलताशांचा गजर संघटनांसह राजकीय पक्षांची स्वागतासाठीची लगबग दिसली.

राजराजेश्वर मंदिरात दिवसभर भािवकांची मोठी गर्दी होती. मिरवणुकीतील शिवभक्तांच्या स्वागतासाठी संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला.

शहराचे आराध्यदैवत राजराजेश्वराला शेकडो कावडींनी हजारो लिटर पाण्याचा जलाभिषेक करत शिवभक्तांनी ६८ वर्षांची कावड परंपरा जोपासली. अकोलेकर १९४५ पासून श्रावणातील अखेरच्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल कावडीने आणून राजेश्वराला जलाभिषेक करतात. आज, २५ आॅगस्टला हा पालखी, कावड उत्सव उत्साहात पार पडला. रविवारी दिवसभर कावडधारी, शिवभक्त ताफ्यासह वाघोलीकडे (गांधीग्राम) रवाना झाले होते. तेथील शिव मंदिरात विधिवत पूजन करून पूर्णा नदीचे जल कावडीत भरण्यात आले. भल्या पहाटेपासून अकोल्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.