आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khairlanjichya Mathyavar Marathi Movie At Akola Home Gard Office

अकोला होमगार्ड कार्यालयात ‘खैरलांजीच्या माथ्यावर’चे शूटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा होमगार्ड कार्यालय स्टुडिओ बनले असून, कार्यालयात 11 सप्टेंबरला रात्री ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाचे शूटिंग झाले. 2005 मध्ये एक भीषण, अमानुष हत्याकांड घडले होते. या घटनेवर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. या चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण 11 सप्टेंबरला जिल्हा होमगार्ड कार्यालयात केले.या वेळी जिल्हा समादेशकांच्या कक्षाला पोलिस अधीक्षकांचा कक्ष म्हणून दाखवण्यात आले. या चित्रपटात पोलिस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेचे शूटिंग करण्यात आले. या चित्रपटात माजी आमदार तुकाराम बिरकड प्रमुख भूमिकेत आहे.

महानिदेशकांची परवानगी
होमगार्ड कार्यालयात शूटिंगकरिता महानिदेशक कार्यालयाच्या आदेशानुसार परवानगी दिली.ही परवानगी एका तासासाठी दिली. शूटिंगसाठी इमारतीचा वापर केला. विद्युत पुरवठय़ासह साहित्याची व्यवस्था चित्रपटाशी संबंधितांनी केली होती.’’ विजय उजवणे, जिल्हा समादेशक, होमगार्ड.

एओंच्या कक्षावरही ताबा
शूटिंगसाठी आलेले कलावंत, इतर कर्मचार्‍यांनी होमगार्ड कार्यालयातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कक्षाचाही ताबा घेतला होता. येथे साहित्य ठेवले होते.