आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडेलवाल शोरूमच्या टिनशेडसह जाहिरातीचे टॉवर केले जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - थकितकराचा भरणा केल्याप्रकरणी १९ जानेवारीला खंडेलवाल मारोती-सुझुकी शोरूमवर अर्धवट राहिलेली अतिक्रमण हटाव मोहीम सहायक आयुक्त माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात २० जानेवारीला पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत शोरूमच्या मागील टिन शेड, समास अंतरातील अतिक्रमण, सर्व्हिस सेंटर, जाहिरात टॉवर जमीनदोस्त करण्यात आले, तर बांधकामाची फाइल मिळाल्याने शोरूमचे मोजमाप मात्र पथकाला करता आले नाही.

रतनलाल प्लॉट चौकातील खंडेलवाल मारुती-सुझुकी शोरूमचा मालमत्ता कर आकारणीबाबत वाद सुरू आहे. महापालिका मालमत्ता कर विभागाच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण न्यायालयातून मिटले आहे. न्यायालयाने २००५-२००६ पासून महापालिकेने आकारलेल्या कराचा भरणा करणे गरजेचे आहे. परंतु, शोरूमने या कराचा भरणा करता जुन्याच कर आकारणीनुसार कराचा भरणा केला. मालमत्ता कर विभागाने वारंवार पाठपुरावा करूनही थकित मालमत्ता कराचा भरणा केल्याने नव्यानेच रुजू झालेल्या सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी सोमवारी शोरूमला सील ठोकले होते. २० जानेवारीला पुन्हा मालमत्ता कर वसुली तसेच अतिक्रमण हटाव पथकाने शोरूमचे मागील बाजूस तसेच समास अंतरात असलेले टिन शेड तसेच वॉटर सर्व्हिस सेंटर उद्ध्वस्त केले.

सहायक आयुक्त माधुरी मडावी यांना शोरूमचे मोजमापही करायचे होते. परंतु, बांधकाम नकाशाची फाइल मिळाल्याने हे मोजमाप रखडले.अतिक्रमण काढल्यानंतर तेथे झालेला कचरा उचलण्यास सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी स्वत: सुरूवात केली होती.