आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता उन्हाळ्यातही शाळांमध्ये खिचडी, जिल्ह्यातील १४२३ गावांमधील झेडपीच्या शाळेत उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या झळांपासून काहीअंशी बचाव व्हावा म्हणून शासनाने आता उन्हाळी सुटीत शालेय पोषण आहार वितरणाचा निर्णय घेतला अाहे.
जिल्ह्यातील १४२३ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिक्षकांनी नियोजनात्मक धोरण अवलंबिल्यास उन्हाळी सुटी गमावता ‘विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवा अध्याय’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू करण्यास मदत होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून, शेतमजुरांची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे अाता पाेटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला अाहे. किमान त्यांच्या चिमुकल्यांना पाेषक अाहार मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत अाहे. जिल्ह्यातील १४२३ दुष्काळग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या वर्ग ते आणि वर्ग ते वीच्या शाळांमध्ये मेपासून २६ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला जाणार आहे.
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये खासगी शाळा पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ करतात. तसेच शैक्षणिक क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासोबत इतर विद्यार्थ्यांच्या उपयुक्त ठरणारे उपक्रम राबवतात. या उन्हाळी सुटीमध्ये या जिल्हा परिषद शाळांना शालेय पोषण आहार वाटपाच्या उपक्रमातून संधी चालून आली आहे. हा उपक्रम राबवणे सक्तीचे करण्यात आले अाहे.
शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीचा विचार केल्यास या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास साध्य करू शकतात. शाळेतील शिक्षकांनी सुट्या ठरवून प्रत्येक शिक्षकाने कोणता उपक्रम हाती घ्यायचा आणि त्याचा विद्यार्थ्यांना भरपूर लाभ देण्याचे निश्चित केल्यास शिक्षकांची सुटीही वाया जाणार नाही. शिवाय पोषण आहार वितरणाचा उपक्रम प्रभावीपणे राबवला जाईल. अनेक विकासात्मक प्रयोग या कालावधीमध्ये शाळेमध्ये घेतले जाऊ शकतात. यास पालक विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळणे सहज शक्य होणार आहे. त्यातून विद्यार्थी घडवण्यासोबतच जिल्हा परिषद शाळांचा दर्जाही सुधारण्याचे प्रयत्न करण्याची संधी या शाळांना चालून आली आहे. २६ जूनपर्यंत जिल्ह्यातीलवर्ग ते आणि वर्ग ते वीच्या शाळांमध्ये मेपासून २६ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला जाणार आहे.

नियोजनासाठी प्रयत्न करणे आवश्यक
शालेय पोषण आहार वाटप सक्तीचे आहे. शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश आहेत. शिक्षकांनासुद्धा उन्हाळी सुटी उपभोगता येणार असून, शाळेमधील शिक्षकांनी यासाठी सुट्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी प्रतिसाद मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून इतर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतल्यास प्रभावी कार्य शक्य होणार आहे.'' प्रशांतघुले,अधीक्षक, शाले यपोषण आहार, जि. अकोला
१.८३ लाख विद्यार्थ्यांना लाभ
जिल्ह्यातील १४२३ शाळांमधील इयत्ता ते पर्यंतचे एक लाख हजार विद्यार्थी आणि इयत्ता ते मधील ८१ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन केल्यास लाख ८३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबतच संस्कार, क्रीडा, शिक्षण, मार्गदर्शन शिबिरे या माध्यमातून त्यांना सर्वांगीण विकासाचा लाभ मिळणार आहे.