आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपहरण प्रकरणातील एका संशयितास अटक; टोळीविरोधी पथक झाले बरखास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गेल्या चार दिवसात शहरात चर्चेचा विषय बनलेल्या गुंठा याच्या अपहरण प्रकरणात एका संशयित आरोपी बजरंग भीमराव सोळंकी वय 38 रा. बोरी अरब, ता. दारव्हा यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई बुधवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास बोरी अरब येथे केली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची तंबी पोलिस अधीक्षकांनी पथकांना दिली आहे.

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी गौरव राऊत ऊर्फ गुंठा वय 27 वर्षे रा. पिंपळगाव याचे अपहरण करण्यात आले होते. रविवारी रात्री पिंपळगाव परिसरात घडलेल्या या घटनेनंतर संघटित गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असलेल्या टोळ्या पुन्हा एकदा समोरासमोर येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच बुधवारी दुपारी पोलिस अधीक्षकांनी सर्व विशेष पथकांना पाचारण करुन आरोपींना अटक करण्याची तंबी दिली. त्यातच एटीएस पथकातील दोन कर्मचार्‍यांना याच प्रकरणात निलंबित करण्यात आले. सोबतच संघटीत गुन्हेगारी वर्तुळावर लक्ष ठेवून त्यांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तयार करण्यात आलेले टोळीविरोधी पथकही बरखास्त केले. या पथकातील सदस्यांना दोन पथकात विभागून त्या पथकांची धुरा सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे आणि महेश तोगडवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

सर्व पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यातच या प्रकरणातील संशयित आरोपी बोरी अरब या ठिकाणी असल्याची माहिती महेश तोगडवार यांच्या पथकाला मिळाली. यावरून पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश तोगडवार, बबलु चव्हाण, रुपेश पाली, सोहेल मिर्झा, गुड्डु बदर आणि सुरेंद्र वाकोडे यांच्या पथकाने तातडीने बजरंग सोळंकी याला
अटक केली.

दरम्यान, गुरुवारी दुपारी बजरंगला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
फरार होण्यापूर्वी घेतली भेट
गौरव उर्फ गुंठा याचे पिंपळगाव परिसरातून अपहरण केल्यानंतर अपहरणकर्ते फरार झाले होते. फरार होण्यापूर्वी त्यांनी बजरंग सोळंकी याची भेट घेतली आणि नंतर ते पुढे निघाले अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यावरून बजरंगला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अपहरणकर्त्याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.