आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सहा तास ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-पेन्शन, अत्यावशक सुविधा व वैद्यकीय रजेसह इतर सुविधा मिळाव्यात, यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी 6 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील दीड हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
यापूर्वी 31 जानेवारी रोजी या मागण्यांच्या पूर्तीकरिता 2100 अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांनी स्थानिक अशोक वाटिकेसमोर रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले होते. 29 जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महिला बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी, बालवाडी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. मात्र, 29 जानेवारी रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याने समस्तअंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक (लाल बावटा) संघटनेतर्फे पहिल्यांदा जेलभरो आंदोलन व आज जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष सुनीता पाटील, कार्याध्यक्ष अँड. एस. एन.सोनोने, ग्रामीणच्या अध्यक्ष आशाताई बारस्कर, नलिनी ताले, अकोट तालुकाध्यक्ष प्रतिभा आढे, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष दुर्गाताई देशमुख, बाळापूर तालुकाध्यक्ष अनिता पुरी, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुमनताई जावरकर, पातूर तालुकाध्यक्ष आशाताई मदने, अकोला शहर अध्यक्ष सुरेखा ठोसर, त्रिवेणी मानवटकर,भा. ना. लांडे, रमेश गायकवाड, रामचंद्र धनभर, नयन गायकवाड, अनंत सिरसाट, गंगाधर लोखंडे, रामदास ठाकरे, अहमद खाँ पठाण यांच्यासह 1500 अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योत्स्ना चोरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांनी भेट देऊन मागण्यांबाबत शासनदरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
अन् ते फिरकलेसुद्धा नाहीत
जिल्हय़ातील सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सकाळपासून जिल्हा परिषदेत उपाशीपोटी ठिय्या देत होत्या. या प्रकाराची माहिती असूनसुद्धा् जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी या आंदोलनाची साधी दखल घेऊन अंगणवाडी कर्मचार्‍यांची भेटही घेतली नाही. या प्रकाराबाबत अंगणवाडी कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
सदस्यांनीही फिरवली पाठ
जिल्हय़ातील प्रत्येक मतदारसंघातून अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. मात्र, कोणत्याही मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्याने आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही.
या आहेत मागण्या
पेन्शन मिळावे, वेतनर्शेणी लागू व्हावी, आजारी रजा मिळाव्यात, उन्हाळी सुटी मिळावी, बालकांना ताजा आहार पुरवावा, सन्मानाची वागणूक मिळावी.
जिल्हा परिषदेच्या आवारात मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या अंगणवाडी सेविका.
सर्वांचेच दुर्लक्ष
आमच्या मागण्यांकडे अधिकार्‍यांसोबत मान्यवर लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. बबिता बगाडे, अंगणवाडी सेविका (माळेगाव बाजार)
वेतन वाढावे
आधीच कमी पगार त्यात जवळपास शासनाच्या सर्व विभागाच्या कामकाजात हातभार लावावा लागतो. म्हणून वेतन वाढणे गरजेचे आहे. वंदना ढोके, अंगणवाडी सेविका (वणीरंभापूर)
अन्यथा तीव्र आंदोलन
44 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा विचार आहे. सुनीता पाटील, जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन अकोला.
फक्त मत मागतात