आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राणघातक हल्ल्यात मजूर गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कृषिनगरातीलमजूर सायकलने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याचा डाव हात मनगटापासून तुटला आहे, तर डोक्यावर तलवारीचे जबर घाव करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. ही घटना शुक्रवारी वाजताच्या सुमारास बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ घडली.

नितीन मधुकर थोरात (वय २७) , असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो बांधकामाच्या कामावरून परतत असताना बारा ज्योतिर्लिंग मंदिरासमोर दुचाकीवरून पाच ते सहा युवक तलवारी घेऊन आले. त्यांनी अचानक नितीनवर हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांच्या डाव्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर तलवारीने वार केले. यामध्ये नितीन कोसळला आणि हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती कळताच घटनास्थळावर सिव्हिल लाइन पोलिस आणि अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी धाव घेतली. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या वेळी जखमी अवस्थेत नितीन थोरात यांनी हल्लेखोरांची नावे पोलिसांनी दिली. नितीन विवाहित असून, त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

पोलिसांनी तक्रार घेतली असती, तर ...
१७जानेवारी रोजी नितीन थोरात याचे नातेवाइकांनी त्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिसांनी ठाण्यात दिली होती. ही तक्रार पोलिसांनी केवळ सही शिक्का मारून परत केली होती. त्यानंतर पोलिसांनी काहीही तपास केला नाही. त्या तक्रारीमध्ये सात ते आठ युवकांनी घरात घेऊन तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. घटनेची तक्रार इंदूबाई कांबळे यांनी दिली होती. त्याच घटनेतील हल्लेखोर असल्याचा आरोप नितीन थोरातच्या आईने आणि मामा प्रथम कांबळे यांनी केला .