आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सोने खरेदीकडे अजूनही कल कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सोन्याचा भाव 34 हजारांवर होता तेव्हाही महिलांचा सोने खरेदीकडे कल होता आणि आता 27 हजार रुपये तोळा भाव असला तरी तेच वातावरण सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. महिलांना सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची हौस असते आणि अडीअडचणीच्या वेळीही सोनेच सोन्यासारखा संसार सावरण्यास मदत करते. त्यामुळे सेन्सेक्स वाढीचा सोने खरेदीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट मत जेम्स अँड ज्यूवेल्स ट्रेडिंग असो.चे संस्थापक संचालक नितीन खंडेलवाल यांनी व्यक्त केले.
शेअर बाजाराचा इंडेक्स आज 25 हजारांवर पोहोचल्यामुळे शेअरमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वाढेल, अशी चर्चा होत आहे. परंतु, या स्थितीचा सराफा बाजारावर परिणाम होणार नाही, असे खंडेलवाल म्हणाले. मुदती ठेवी, शेअर्समध्ये गुंतवणूक होत असली तरी सोन्यातील गुंतवणूक दीर्घकाळ टिकणारी असते. 365 दिवस केव्हाही सोन्याचा व्यवहार करता येतो. अडचणीच्या वेळी आपल्या जवळचे सोने अडचणीतून मार्ग काढण्यास मदत करते. इतकेच नाही, तर सोन्याला गंज चढत नाही, केमिकलचा त्यावर परिणाम होत नाही, तात्पुरते गहाण ठेवता येते. शेअरचे तसे नाही. अडचण आली तर शेअर विकावाच लागतो. रुग्ण दवाखान्यात भरती असताना पैसेच भरावे लागतात. तेथे शेअर सर्टिफिकेट गरज भागवू शकत नाही.

वेतन झाले की, त्यातील काही रकमेचे सोने घेणार्‍या महिला ग्राहक आहेत. दर महिन्याला त्या ठरावीक रकमेचे सोने खरेदी करतात. महाराष्ट्रीयन माणसाचा कल हा बचतीकडे असतो, त्यामुळे सोने खरेदी त्याही दृष्टीने उत्तम आहे, तर शेअरमध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट असते.

शेअरचे व्यवहार करताना रिस्क आहे. 100 रुपयांचे सव्वाशे होतीलच असे नाही, तर ते साठदेखील होऊ शकतात. तर, फिक्स डिपॉझिटमध्ये ठरावीक रक्कम तुम्हाला मिळणार असते. आजचा दर पाहिला तर सोन्याच्या दरात फार तफावत राहत नाही. तसेही आता बाजाराचा विचार केला तर सोन्याचे भाव स्थिर आहेत. त्यामध्ये फार फेरबदल होण्याची शक्यता फारसी नाही, असे संचालक नितीन खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.