आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडो हत्येप्रकरणी दोघे कोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-खंडणीसाठी अपहरण करून अडीच वर्षीय लाडो उर्फ विशाखा सागर बागाणी या चिमुकलीची हत्या करणार्‍या दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय दत्ता पचांगे (19) व अक्षय कैलास पुरोहित (20) या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अक्षय पुरोहितजवळून पोलिसांनी जेवणाचा डबा जप्त केला आहे. त्याला या काळात जेवण कुणी पुरवले, त्याला कुणी सहकार्य केले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बागाणी कुटुंबीयांचे पाणावले डोळे
‘लाडो परिवाराची लाडकी होती. तिच्या हत्येचे दु:ख मनाला टोचणारे आहे’, अशी भावना लाडोचे आजोबा केदारकुमार बागाणी यांनी व्यक्त केली. नोकर अक्षयचा हत्याकांडात सहभाग असणे, हे दु:खद असल्याचे ते म्हणाले.
वकीलपत्र स्वीकारणार नाही
‘लाडोची हत्या करणार्‍या आरोपींचे वकीलपत्र कुणीही स्वीकारणार नाही, असा ठराव बार कौन्सिलने घेतला आहे, अशी माहिती बार कौन्सिलचे अध्यक्ष अँड. मनोज राठी आणि सचिव अँड. काकड यांनी दिली.