आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या भागात 22 डिसेंबरला, आजची रात्र राहणार सव्वातेरा तासांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पृथ्वी अक्ष तिच्या भ्रमणकक्षेशी २३.५ अंशाचा कोन करत आहे. २२ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सूर्य सर्वाधिक दक्षिणेकडे आल्याने या दिवशी सर्वात लहान दिवस, तर सर्वात मोठी रात्र राहणार आहे, अशी माहिती निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी दिली.
पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर दक्षिण दिशेकडे होणारे भासमान भ्रमण म्हणजेच उत्तरायण दक्षिणायन होय. पृथ्वी अक्ष तिच्या भ्रमणकक्षेशी २३.५ अंशाचा कोन करत असल्याने हिवाळ्यात सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे, तर उन्हाळ्यात उत्तरेकडे झुकलेला दिसतो. २२ डिसेंबरपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत आहे. त्यामुळे दिनमानातही वाढ होत जाते. मात्र, फरक मकर संक्रांतीदरम्यान जाणवतो. आपल्या भागात २२ डिसेंबरला सूर्योदय वाजून ५६ मिनिटांनी होत असून, सूर्यास्त ५.४५ वाजता होईल. याचा अर्थ दिवस केवळ पावणे अकरा तासांचा, तर रात्र चक्क सव्वातेरा तासांची असेल.

पूर्व क्षितिजावर सायंकाळी मिथुन राशी, तर उलट क्रमाने वृषभ-मेष राशी आकाशात बघता येतील. लालसर तांबुस रंगाचा मंगळ, मकर राशीत रात्रीच्या प्रारंभीच पश्चिमेकडे दिसेल. ग्रहताऱ्यांचे फार पूर्वीपासून आपले नाते दृढ करण्यासाठी आपणही त्यांच्या जवळ येण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.