आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Last Three Months Interim In Charge Municipal Commissioner Not Come Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडेतीन महिन्यांपासून मनपात पायच ठेवणारे पहिलेे प्रभारी आयुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी साडेतीन महिन्यांपासून महापालिकेत पाऊलच ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मनपात पाऊल ठेवणारे ते पहिलेच प्रभारी ठरले आहेत. यापूर्वी आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिका-यांनीही पाहिला आहे. जिल्हाधिका-यांनीही महापालिकेत येऊन कामकाज केले आहे. त्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिका-यांना महापालिकेची अॅलर्जी आहे का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
डॉ. महेंद्र कल्याणकर २० ऑक्टोबर २०१४ ला उच्च शिक्षणासाठी १८ डिसेंबरपर्यंत रजेवर गेले होते. यादरम्यान, आयुक्तपदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे सोपवण्यात आला. परंतु, ही रजा संपल्यानंतर त्यांनी रुजू होता, रजा वाढवून घेतली. २० जानेवारीला ते रुजू होणार होते. आयुक्त अकोल्यात दाखलही झाले. परंतु, त्याच दिवशी त्यांच्या बदलीचा आदेश धडकला. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिका-यांकडेच राहिला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकरही दीर्घ रजेवर गेले आहेत. सहायक आयुक्त माधुरी मडावी रुजू झाल्या नसत्या, तर महापालिकेचे कामकाज कसे चालले असते? अशी चर्चा आता नागरिकांमध्येच सुरू आहे. त्यामुळेच महापालिकेत अधिका-यांची वानवा असताना अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी महापालिकेत किमान तास-दोन तास येऊन कामकाज पाहावे, अशी मागणी नगरसेवकांनीही केली आहे. परंतु, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनपात येत नसल्याने त्यांना महापालिकेची अॅलर्जी आहे का? अशी चर्चाही सुरू आहे.

दोन तास कामकाज पाहावे
वानवा असताना अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी महापालिकेत किमान तास-दोन तास येऊन कामकाज पाहावे, अशी मागणी नगरसेवकांनीही केली आहे. परंतु, अतिरिक्त जिल्हाधिकारी महापालिकेत येत नसल्याने त्यांना महापालिकेची अॅलर्जी आहे का? अशी चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.

१५ ते २० दिवस थांबा
नव्याअधिका-यांच्या नियुक्तीसाठी चाचपणी सुरू आहे. चांगला अधिकारी आणण्यासाठी काही दिवस लागतील. त्यामुळे नव्या आयुक्तांसाठी आणखी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागू शकतो. डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री

नव्या आयुक्तांची प्रतीक्षा
अकोलेकरांनाआयुक्तांची प्रतीक्षा हा सातत्याचा विषय ठरला आहे. आयुक्तांची बदली होते. मात्र, त्याचवेळी नवे आयुक्त रुजू होत नाहीत. त्यामुळे अनेक महिने महापालिकेचे कामकाज रखडते. नवे आयुक्त आल्यानंतर पुन्हा ते त्यांच्या पद्धतीने काम पाहतात. नव्या पद्धतीच्या कामकाजाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्यांची बदली होते. या सर्व प्रकारामुळेच महापालिकेचे कामकाज रखडले आहे. आताही अकोलेकरांना पुन्हा एकदा आयुक्तांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.