आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाधिक मताधिक्य : लक्ष्मणराव तायडे १०,८५१ मतांनी विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभेच्या१९९५ च्या निवडणुकीत आलेली युतीची लाट १९९९ ला ओसरली. १९९५ ला पाचही विधानसभा मतदारसंघांवर कब्जा करणाऱ्या युतीला या निवडणुकीत दोन जागांवर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे, तर युतीच्या उमेदवारांचे मताधिक्यही कमी झाले. या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन विजयी होण्याचा मान बाळापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे यांनी पटकावला.

त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नारायण गव्हाणकर यांच्यावर १० हजार ८५१ मतांनी मात केली. तर, त्यांच्या खालोखाल मताधिक्य घेण्याचा मान भारिप-बमसंचे डॉ. दशरथ भांडे यांनी मिळवला. बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघात त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर १० हजार ३९० मतांनी विजय प्राप्त केला.

या निवडणुकीत युतीमध्ये जागा बदलाची मागणी झाली होती. परंतु, जागावाटप जैसे-थे ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला. तर, उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही बाबींमुळे युतीत बंडखोरी झाली. त्यातल्या त्यात शिवसेनेत बंडखोरी झाली. बाळापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असताना शिवसेनेचे सेवकराम ताथोड यांनी बाळापूरमधून निवडणूक लढवली. त्यांनी १६ हजार १६१ मते घेतल्याने भाजपचे नारायण गव्हाणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर बोरगावमंजू (आताच्या अकोला पूर्व) विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले गजानन दाळू गुरुजी यांनी राष्ट्रवादीकडून मैदानात उडी घेतली. शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाल्याने भारिप-बहुजन महासंघाला फायदा झाला आणि भारिप-बमसंचे डॉ. दशरथ भांडे यांनी शिवसेनेचे विजय मालोकार यांच्यावर १० हजार ३९० मतांनी विजय प्राप्त केला. विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत आलेली युतीची लाट १९९९ ला ओसरून त्यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले.

जिल्ह्यातील इतर मतदारसंघांत उमेदवारांना मिळालेले मताधिक्य असे

विधानसभा उमेदवार पक्ष मिळालेले मताधिक्य
अकोटरामदास बोडखे भारिप-बमसं ९४९१
अकोला गोवर्धन शर्मा भाजप २५१५
मूर्तिजापूर संजय धोत्रे भाजप ४७००