आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर बांधकामासाठी मनपात भरावा लागणार ‘एलबीटी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्य शासनाने महापालिकांच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध करांच्या बोझ्यात अडकवण्याचा कयास बांधला की काय, असा प्रश्न आता उभा ठाकला आह़े शासनाच्या एलबीटीसंदर्भातील परिपत्रकानुसार, नागरिकांना घर बांधण्यासाठीही ‘एलबीटी’ भरावा लागणार आह़े

शासनाने ‘एलबीटी’संदर्भात परिपत्रक जाहीर केले असून, या परित्रकात घर बांधण्याची परवानगी घेण्यासाठी नागरिकांना ‘एलबीटी’कर आकारण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासन सर्वसामान्यांची सर्वच बाजूंनी लूट करत आहे. प्रती स्क्वेअर मीटरप्रमाणे 100 रुपयांचा ‘एलबीटी’कर आकारला जाणार आहे. घर बांधकामासाठी लागणार्‍या सिमेंट व लोखंड या मालांवर हा ‘एलबीटी’ आकारला जाईल़ यासाठी शहरातल्या शहरात माल खरेदी करणार्‍यांना कमी, तर बाहेरून आयात करणार्‍यांना जास्तीचा ‘एलबीटी’ आकारला जाणार आह़े नवीन घर बांधणार्‍या नागरिकांना ‘एलबीटी’ विभागात नोंदणी करून खरेदी केलेल्या मालाच्या पावत्या ‘एलबीटी’ कर आकारण्यासाठी सादर कराव्या लागतील. घर बांधण्याच्या परवानगीसाठी एलबीटी विभागाचे ना हरकरत प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे.

अंमलबजावणी
शासनाच्या निर्णयानुसार शहरात ‘एलबीटी’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. घराचे बांधकाम करताना ‘एलबीटी’ लागणार आहे. 100 रुपये प्रती स्क्वेअर मीटर या दराने ‘एलबीटी’ भरावा लागेल.’’ कैलास पुंडे, उपायुक्त, मनपा, अकोला.