आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील कंत्राटदारांना भरावा लागणार एलबीटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मनपा हद्दीतील कामे घेणार्‍या कंत्राटदारांनाही स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नोंदणी बंधनकारक केली आहे. कामासाठी आकारलेल्या मालाच्या किमतीवर किंवा कंत्राट मूल्याच्या रकमेवर 0.25 टक्के ठोक दराने त्यांना एलबीटी भरावा लागणार आहे.

कंत्राटदारांमार्फत शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्वायत्त संस्था, चॅरिटेबल ट्रस्टची कामे केली जातात़ निविदा काढून कंत्राट दिले जात़े मनपा, जिल्हाधिकारी, पाटबंधारे, बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, बीएसएनएल, मध्य रेल्वे, जीवन प्राधिकरण, एस.टी., महावितरण आदी कार्यालयांमार्फत कामे केली जातात़ नियमानुसार शासकीय कार्यालयांत मनपा हद्दीत कामे हाती घेणार्‍या कंत्राटदारांना एलबीटीची नोंदणी बंधनकारक आह़े बांधकाम व्यावसायिकांनाही नोंदणी बंधनकारक आह़े

‘वर्क ऑर्डर’ पूर्वी कर
कार्यालयातील कामाचे ‘वर्क ऑर्डर’ देण्यापूर्वी कंत्राटदाराला कामाच्या रकमेच्या 0.25 टक्के ठोक रक्कम एलबीटी कर मनपाने निश्चित केलेल्या बँक खात्यात भरावा लागेल. त्याची छायांकित प्रत जोडल्याशिवाय कंत्राटदाराला कामाचे आदेश देऊ नये, अशी गळ मनपाने सर्व कार्यालयातील विभागप्रमुखांना घातली आहे.