आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी, जकातविरोधात शपथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एलबीटी, जकातसारख्या जाचक करांना हद्दपार करण्यासाठी व्यापार्‍यांनी संघटित होणे गरजेचे आहे. या जाचक करांना हद्दपार करणार्‍या पक्षालाच आगामी निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असे आवाहन नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी येथे केले.
विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रिज व संलग्न संघटनांतर्फे गुरुवार, 6 मार्चला सकाळी 10 वाजता खुले नाट्यगृहात एलबीटी, जकातविरोधात जाहीर शपथ सभेचे आयोजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नागपूर चेंबरचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, सचिव हेमंत गांधी, चेंबरचे अध्यक्ष कमलेश वोरा, रमाकांत खंडेलवाल, निकेश गुप्ता, रूपेश राठी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेला व्यापारी, उद्योजक व सर्वसाधारण नागरिकांची मोठी उपस्थिती होती. उपस्थितांनी एलबीटी, जकातसारख्या जाचक करांना हद्दपार करणार्‍या पक्षालाच पुढील निवडणुकीत पाठिंबा देण्याची शपथ या वेळी घेतली. दीपेन अग्रवाल यांनी एलबीटी कायद्यांतर्गत व्यापार्‍यांना पुढे येणार्‍या अडचणींवर प्रकाश टाकला. चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत खंडेलवाल यांनी उपस्थितांना शपथ दिली. सर्व व्यापार्‍यांना त्यांच्या कर्मचार्‍यांसमवेत निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेश गुप्ता यांनी केले.
रूपेश राठी यांनी आभार मानले. सभेत किराणा र्मचंट, कोठडी बाजार, आयर्न अँड स्टील र्मचंट, टिंबर र्मचंट, अकोला टी र्मचंट, कॅनवॉसिंग एजंट, प्लायवूड र्मचंट, गुड्स ट्रान्सपोर्ट, दाल मिल, हार्डवेअर, कापड बाजार, इंडस्ट्रियल मशिनरी, सराफा, ऑइल मिल, केमिस्ट व ड्रगिस्ट, पेट्रोल डीलर्स, सिमेंट, इलेक्ट्रिक र्मचंट, न्यू क्लॉथ मार्केट, कंझ्युमर प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, आडतिया मंडळ, ऑटो पार्ट्स डीलर्स, सायकल डीलर्स, रेडिमेड व होजियरी, जुना बारदाना, कन्फेक्शनरी, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन आदी जवळपास 70 व्यापारी संघटनांनी सहभाग नोंदवला. सभेला चेंबरचे सर्व पदाधिकारी, सदस्य, उपसमिती सदस्य तसेच संलग्न संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष कमलेश वोरा, उपाध्यक्ष रमाकांत खंडेलवाल, विजय पनपालिया, सचिव निकेश गुप्ता, सहसचिव रूपेश राठी, कोषाध्यक्ष कासमअली नानजीभाई, जकात समितीचे वसंत बाछुका, रमेश कोठारी, दिलीप खत्री आदींनी दिली.