अकोला - महापालिका क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या बांधकामधारकांनी एलबीटीचा भरणा केला आहे की नाही? याची तपासणी आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी मे रोजी केली. ज्या बांधकामधारकांनी एलबीटीचा भरणा केला नाही, त्यांनी मेपर्यंत हा भरणा करावा, अशी सूचना आयुक्तांनी केली.
आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी गीतानगर भागातील हरीश भोजवानी, गोविंद अग्रवाल, मधुसूदन भुतडा, वाशीम बायपास येथील आसिफ खान मुस्तफा खान, किल्ला चौक येथील राजेश भारती यांच्या बांधकामाची पाहणी केली. ज्या बांधकामांना नगररचना विभागाची परवानगी आहे, अशा बांधकामधारकांकडून एक पट स्थानिक स्वराज्य संस्था कराची वसुली ज्या नागरिकांनी
आपल्या बांधकामांची नगररचना विभागाची परवानगी घेतलेली नाही, अशा बांधकामधारकांवर पाच पट शास्तीसह स्थानिक संस्था कराची आकारणी करावी तसेच थकित स्थानिक संस्था कराचा भरणा करावा नवीन बांधकामधारकांनी स्थानिक संस्था कराचा भरणा तीन दिवसांत करावा अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी दिला. या वेळी गजानन मुर्तुळकर, दिलीप जाधव, सुधीर माल्टे, संतोष नायडू, उमेश सटवाले, संतोष सूर्यवंशी, देवेंद्र भोजने, गणेश टाले, विष्णू राठोड, मंगेश जाधव, राजू मिसुरकर, शंकर शर्मा आदी उपस्थित होते.