अकोला-स्थानिक संस्था कर (एलबीटी) चुकवल्या प्रकरणात सारस्वत बँकेला महापालिका पथकाने आज सुमारे 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात महापालिका एलबीटी विभागाने बँकेत जाऊन कारवाई केली. येथील टिळक मार्गावर उदय चित्रपट गृहासमोर असलेल्या सारस्वत बँकेत आज स्थानिक संस्था कर विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांना नोटा मोजण्याचे यंत्र सारस्वत बँकेत आणल्याचे दिसले. नोटा मोजणार्या या यंत्राची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याने त्याचा स्थानिक संस्था कर व त्यावरील दंड असे एकूण 24 हजार 300 रुपये दंडापोटी सारस्वत बँकेकडून वसूल करण्यात आले.
व्यापार्यांनी एलबीटीची नोंदणी करण्याची आहे. एलबीटी वसुली पथकाचे शहरातील वाहनांवर लक्ष आहे. एलबीटी पथकाद्वारे पाहणीत अशा प्रकारे अनियमितता आढळल्यास व्यापार्यांवर व संस्थांवर कडक कारवाई करण्याचा इशारा या वेळी एलबीटी विभागाचे प्रमुख जी. एम. पांडे यांनी दिला आहे.