आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचा दबाव; अधिकारी-कर्मचारी त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी वर्गावर दबाव आणत असल्यामुळे येथील शासकीय अधिकारी-कर्मचारी वैतागले आहेत.
राज्य शासनाच्या विविध खात्यांपैकी महसूल, पोलिस, कृषी ग्रामविकास तसेच नगर विकास ही खाती सर्वसामान्य जनतेशी निगडीत आहेत. पोलिस खात्याशी सर्वांचाच संबंध येतो असे नाही. मात्र, इतर खात्यांमध्ये सर्वसामान्यांना जावे लागते. त्याठिकाणी राजकीय हस्तक्षेप वाढलेला दिसून येत आहे. एखाद्या योजनेचे लाभार्थी ठरवायचे असतील तर काही राजकीय पुढारी अधिकारी वर्गांना शिफारस करतात. लोकप्रतिनिधींची शिफारस एक वेळा समजूनही घेता येईल. मात्र, कधीच निवडूनन आलेले राजकीय पुढारी विनाकारण नेतेगिरी करत असल्याचे दिसून येत आहे.

अधिकारी - कर्मचारी वर्गाने नियमाप्रमाणे कामे करावीत, असे भाषणात सांगणारे काही नेते शासकीय कामामध्ये नियम लावल्यास त्यांचा तीळपापड होतो. एखादे प्रकरण घडल्यास राजकीय नेते संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये बराच वेळ ठाणं मांडून बसतात. पोलिस स्टेशनमध्येही ते हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही माझ्या कामात राजकीय हस्तक्षेप नाही. त्यामुळेच पोलिस आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात.
विधायक सूचना अमलात आणतो
पं.स.चेसदस्य नागरिकांनी निर्वाचित केलेले असतात. त्यांच्या विधायक सूचना आम्ही अंमलात आणतो. के.आर. तापी, गटविकास अधिकारी, अकोट, पं. स.
नागरिकांना सोयीसुविधा योजनांचा नियमित मिळावा लाभ
> नागरी सेवा सुविधा शहरवासीयांना पुरवण्यासाठी राजकीय नेत्यांनी नगरपालिकेेत सकारात्मक दबावगट निर्माण केला पाहिजे.
> रेल्वे रिझर्व्हेशनसाठी दोन खिडक्या असाव्यात, यासाठी प्रयत्न करून ती बाब पूर्णत्वास गेली पाहिजे. वरिष्ठ अधिकारी आले की, निवेदनाचा सोपस्कार केला जातो.
> इंटरनेटची ब्रॉड ब्रँड सेवा वारंवार विस्कळीत होते. त्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करावी.
> बसस्थानक, रेल्वेस्थानकावर तत्पर सेवा देण्यासाठी प्रशासनावर दबाव असला पाहिजे.
> शेतकरी वर्गासाठी शासनाकडून भरीव योजना मंजूर करून ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ताधारी विरोधकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.