आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलआयसीत आता प्रीमियम जास्त, बोनस कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एलआयसी आणि खासगी विमा कंपन्यांना स्पर्धेसाठी समान वातावरण तयार करण्याच्या धोरणाखाली एलआयसीच्या विमा पॉलिसी नव्या रूपात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मिळणारा बोनस कमी आणि प्रीमियम वाढण्याची शक्यता निर्माण झाली आह़े येत्या 1 ऑक्टोबरपासून एलआयसी आणि खासगी विमा कंपन्यांच्या पॉलिसी समान राहणार आहे. याचा फटका विमाधारकांना बसणार आहे.

आयआरडीए अर्थात विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या प्राधिकरणाने विमा क्षेत्रातील सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आह़े त्यातून 83.24 टक्के बाजार हिस्सा असणार्‍या 16.71 टक्के बाजार हिस्सा असलेल्या 24 खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना आपल्या पॉलिसीमध्ये बदल करावे लागत आहेत़ राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना एलआयसीसोबत स्पर्धा करताना येणार्‍या अडचणी ध्यानात घेऊन आणि बाजारपेठेवर कुणा एकाचीच मक्तेदारी राहू नये, या जागतिकीकरणातील धोरणानुसार विमा क्षेत्रात सुधारणा केल्या जात आहेत़ एलआयसीने आपल्या व्हिजन 2020 मध्ये प्रत्येक खिशात एक पॉलिसी, सूक्ष्म विमा आणि गावोगाव मिनी ऑफिस हे धोरण ठेवले आह़े सध्या एलआयसीच्या 52 योजना बाजारात आहेत़ नवजात बालकापासून 85 वर्षांच्या वृद्घापर्यंत सर्वांना विमा उतरवता येणार्‍या या योजना आहेत. कमी प्रीमियम आणि बोनस व चांगला परतावा अशा एलआयसीच्या योजना होत्या़ या योजना आता बंद होणार आहेत.

ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नव्या योजना दाखल होणार असून, एलआयसी आणि खासगी कंपन्यांच्या सगळ्या योजना आता सारख्याच असणार आहेत़ शिवाय बोनस बंद होण्याची शक्यता अधिक आह़े या बोनसवरच एलआयसीच्या पॉलिसीवर ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळत होता़ यापुढे 1 ऑक्टोबरनंतरच्या पॉलिसींवर बोनस मिळण्याची शक्यता नसली तरी, त्याआधी घेतलेल्या पॉलिसींना बोनस मिळणार आह़े आगामी काळात मोबाइलसारखी इन्शुरन्स पोर्टेबिलिटी येणार असून, दुसर्‍या कंपनीकडे आपली विमा पॉलिसी वळवता येणार आह़े.

ऑक्टोबरपासून विमा पॉलिसीमध्ये व्यापक बदल होणार आहेत. विमाधारकांना सेवाकरही लागेल. मुख्य कार्यालयातून त्यासंदर्भातील नियम यायचे आहेत. विमाधारकांच्या फायद्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अधिकाअधिक पॉलिसी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’ पी. जी. शिरसाट, मुख्य प्रबंधक, एलआयसी, अकोला