आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलेगावात बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलेगाव- कुठलीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसताना येथे रुग्णांना सलाइन सर्रास लावल्या जात आहे. अर्धवट शिक्षण असलेल्या इसमाकडून रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ग्रामीण भाग असल्याने येथील गरजू नागरिकांकडून आर्थिक लूट केली जात आहे. बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, आलेगाव परिसरात वैद्यकीय क्षेत्राच्या "आयचा घो' अशी खमंग चर्चा सुरू आहे.

एका बीएचएमएस डॉक्टरने आलेगावात दहा खाटांचे रुग्णालय थाटले आहे. हा भाग आदिवासीबहुल असल्याने परिसरात गरजू लोकांना दिलासाच वाटला. मात्र, येथे दहावी नापास मुलाकडून सलाइन लावून घेतल्या जाते. तसेच अर्धवट शिक्षण असलेले डॉक्टरही रुग्णांची तपासणी करून औषधी देत आहेत.

आठवी, नववी नापास असलेले कर्मचारी हे डॉक्टर हजर नसताना स्वत:च रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार थांबवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
एक्स-रे तज्ज्ञ नाही, मशीन मात्र उपलब्ध
यारुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टरांचा तोटा असताना डॉक्टरने एक्सरे मशीन आणून ठेवली आहे. एक्स-रे काढल्यानंतर त्याची माहिती देणारा तज्ज्ञ येथे आवश्यक आहे. मात्र, तज्ज्ञच येथे नसल्याने गोरगरिबांना उलटसुलट सल्ले दिले जात आहेत. त्या सल्ल्यानुसारच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, अशा उपचारांमुळे अनुचित घटनाही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आजाराची भीती दाखवून उकळल्या जातात पैसे
आलेगावपरिसरातील बहुतांश भाग आदिवासी गावांसोबत जोडल्या गेला आहे. आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे बोगस डॉक्टरांनी परिसरातील काही गाावांमध्ये मुक्कामच ठोकला आहे. अशिक्षित लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना आजाराची भीती दाखवून पैसे उकळल्या जात आहेत.
गंभीर प्रकाराची चौकशी करून कारवाई करू
आलेगावयेथील रुग्णालयातील प्रकार अत्यंत गंभीर असून, होमिओपॅथिक असलेल्या कुठल्याच डॉक्टरला अॅलोपॅथीचा उपचार रुग्णांवर करता येत नाही. जो कोणी करीत असेल, त्या संदर्भात नागरिकांनी तक्रार करावी. नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता बाळागावी. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करू.
डॉ.नितीन अंबाडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.
बातम्या आणखी आहेत...