आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेवन स्टार’ दारू कारखान्याची झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - औद्योगिक परिसरातील कुंभारी येथे राजू जयस्वाल यांच्या मालकीच्या ‘सेवन स्टार’ या देशी दारू निर्मिती करणार्‍या कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी झाडाझडती घेत बुधवारला सील केले होते. मात्र, गुरुवारीच केवळ एका दिवसात कारखाना सीलमुक्त केल्याने संशय व्यक्त होत आहे.

या कारखान्याची तपासणी करण्यासाठी बुधवार, 25 डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांचे पथक आले होते. मात्र, जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत कारखाना सील कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवार, 26 डिसेंबरला सकाळी या कारखान्याची अधिकार्‍यांच्या पथकाने संपूर्ण तपासणी केली.

ही तपासणीची कारवाई दक्षता म्हणून करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अवघ्या काही तासात कुंभारी स्थित असलेल्या देशी दारूच्या कारखान्याची तपासणी कशी होऊ शकते, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीदरम्यान कारखान्यामध्ये काहीही आक्षेपार्ह बाबी आढळल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कारखान्याला लावण्यात आलेले सिल उघडण्यात आले आहे.