आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीने लावला "दुकानचोरी'चा छडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जनता भाजी बाजारात चार महिन्यांपूर्वी साई ड्रायफ्रूटचे दुकान फोडले होते. चोरट्यांनी एक लाख तीन हजार रुपयांची चोरी केली होती. याप्रकरणी दुकान मालकाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. रविवार, १६ नाेव्हेंबर रोजी स्थािनक गुन्हे शाखेने दोन आरोपींना त्यांच्या घरातून अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
रमेश कन्हैयालाल गुरनायी यांचे जनता भाजी बाजारात साई ड्रायफ्रूटचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये १७ जुलै २०१४ रोजी अज्ञात चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून प्रवेश केला होता. त्यांनी लाख २६ हजार ८६८ रुपयांचे काजू बदामसह ड्रायफ्रूटचे पाकिटे, असा ऐवज लंपास केला होता. सिटी कोतवाली पोलिसांना या घटनेमध्ये काहीही हाती लागले नव्हते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे इक्बाल कॉलनीतील मुजाहिद अहमद जमील अहमद (वय २५) आणि मुझफ्फर कॉलनीतील शेख अहमद शेख मुस्लिम (वय १९) या दोघांना त्यांच्या घरून अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फड, एएसआय एस. आर. पाटील, मनोहर मोहोड आणि शेख हसन यांनी केली आहे.

मुद्देमाल हस्तगत करू
याप्रकरणात आणखी दोन आरोपींचा समावेश असल्याची माहिती आहे. या आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल लवकरच हस्तगत करू. दोन दिवसांपूर्वी याच दुकानात चोरी झाली. त्यातही या आरोपींचा समावेश आहे की नाही, हे समोर येईल. -ज्ञानेश्वर फड,पीएसआय