आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election In Vidarbh Region, Divya Marathi, Voters, Akola

10 मतदारसंघांतील तीन मंत्र्यांसह 202 उमेदवारांचे भवितव्य आज होणार यंत्रबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भातील लोकसभेच्या 10 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून मतदारराजा 202 उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद करणार आहे. पाच वर्षातून एकदा ज्याला ‘राजा’ म्हणून मान देण्याचा प्रयत्न उमेदवार करतात तो मतदार आज कुणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतदारराजाला बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान कोण करवून घेतो, याचा कस आज लागणार आहे. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकाची ‘राईट चॉईस’ करताना मतदारांसाठीही आजचा दिवस ‘परीक्षा’च ठरणार आहे.
आज होणार्‍या मतदानात भाजपचे नितीन गडकरी, कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार आणि मुकुल वासनिक, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, आपच्या अंजली दमानिया या प्रमुख नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
निवडणूक शांततेत, निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात पार पडावी यासाठी आयोगाने व्यापक तयारी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विदर्भातील नक्षलग्रस्त गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना तर जणू छावणीचेच रूप आले आहे.
मतदानासाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी, अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त
भंडारा-गोंदिया
प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), नाना पटोले (भाजप), मोरेश्वर मेर्शाम (अपक्ष), संजय नासरे (बसपा) एकूण उमेदवार 26 एकूण मतदार 16 लाख 48 हजार 141
पिपरखारी जंगलात स्फोटके सापडली
वर्धा
सागर मेघे (कॉंग्रेस), रामदास तडस (भाजप), मोहंमद अलीम पटेल (आप) एकूण उमेदवार 22 एकूण मतदार 15 लाख 41 हजार 261
गडचिरोली-चिमूर
डॉ. नामदेव उसेंडी (कॉंग्रेस), अशोक नेते (भाजप). रामराव नन्नावरे (बसपा), डॉ. रमेश गजबे ( आप) एकूण उमेदवार 11 एकूण मतदार 14 लाख 69 हजार 650
यवतमाळ - वाशिम
भावना गवळी (शिवसेना), शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस), राजू पाटील राजे (मनसे) एकूण उमेदवार 26 एकूण मतदार 17 लाख 15 हजार 592
अमरावती
आनंदराव अडसूळ (शिवसेना), नवनीत राणा (राष्ट्रवादी), डॉ. राजेंद्र गवई (रिपाइं गवई गट) एकूण उमेदवार 19 एकूण मतदार 16 लाख 10 हजार 712
चंद्रपूर
संजय देवतळे (कॉंग्रेस), हंसराज अहीर (भाजप), वामनराव चटप (आप) एकूण उमेदवार 18 एकूण मतदार 17 लाख 50 हजार 581
रामटेक
मुकुल वासनिक (कॉंग्रेस), कृपाल तुमाने (शिवसेना), किरण पाटणकर (बसपा), प्रताप गोस्वामी (आप) एकूण उमेदवार 23 एकूण मतदार 16 लाख 75 हजार 415
बुलडाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना), डॉ. कृष्णराव इंगळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बाळासाहेब दराडे (अपक्ष) एकूण उमेदवार 17 एकूण मतदार 15 लाख 86 हजार 192
अकोला
संजय धोत्रे (भाजप), अँड. प्रकाश आंबेडकर (भारिप-बहुजन महासंघ), हिदायत पटेल (कॉंग्रेस), अजय हिंगणकर (आप) एकूण उमेदवार 7
एकूण मतदार 16 लाख 74 हजार 456
नागपूर
विलास मुत्तेमवार (कॉंग्रेस), नितीन गडकरी (भाजप), अंजली दमानिया (आप), मोहन गायकवाड (बसपा) एकूण उमेदवार 33 एकूण मतदार 18 लाख 99 हजार 395