आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Akola Lok Sabha Constituncy

लोकसभा निवडणुकीच्या अर्जांची आज होणार छाननी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी एकूण 22 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची सोमवार, 24 मार्च रोजी जिल्हा निवडणूक कार्यालयात छाननी करण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 18 मार्चपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे प्रा. अजयकुमार हिंगणकर, रा. कालवाडी ता. अकोट, काँग्रेस व अपक्ष म्हणून नारायणराव गव्हाणकर रा. निमकर्दा ता.बाळापूर, भारिप-बमसंतर्फे प्रकाश आंबेडकर रा. यशवंत भवन, कंवरराम सोसायटी, राधाकृष्ण चित्रपटगृहासमोर, अकोला, काँग्रेसतर्फे हिदायतउल्ला पटेल रा. मोहाळा मु. पो. मोहाळा, ता. अकोट यांनी, भाजपतर्फे संजय धोत्रे रा. पळसो बढे ता. अकोला यांनी, बसपतर्फे भानुदास कांबळे रा. बालाजीनगर, राधाकृष्ण टॉकीजचे मागे, अकोला यांनी, संदीप वानखेडे रा. शिवणी खदान, मलकापूर यांनी अपक्ष, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शेख हमीद इमाम रा. भुसावळ जि. जळगाव यांनी, ‘बसप’तर्फे राजकुमार वाघमारे रा. जुना तारफैल, अकोला यांनी अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे या प्रक्रियेत सहभागी होत आहेत.