आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi

आदेशाचे उल्लंघन करणार्‍या चार केंद्राधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - निवडणुकीच्या कामात दिरंगाई करणार्‍या अकोला पूर्व व पश्चिम मतदारसंघांतर्ग चार मतदान केंद्राधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अकोला पूर्व मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी 8 एप्रिलला ही कारवाई केली. निवडणुकीकरिता मतदान केंद्रांवर बीएलओमार्फत निवडणुकीचे काम करावयाचे आहे. याकरिता पश्चिम मतदारसंघांतर्गत मो. हाफिज मो. सईद (सहायक शिक्षक, मनपा प्राथमिक उर्दू मुलांची शाळा क्रमांक 7) व हुसेन अकबर (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शहर शाखा) व गजानन ढगे (कनिष्ठ लिपिक, मनपा), ए. सी. मोरे (कनिष्ठ सहायक, आरोग्य विभाग जिल्हा परिषद) यांची पूर्व मतदारसंघाकरिता ड्युटी लावली होती. या कर्मचार्‍यांना दूरध्वनीद्वारे, घरी जाऊन निरोप दिला, तरी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन निवडणुकीच्या कामात दिरंगाई केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित बीएलओविरुद्ध कार्यवाही करण्याची तक्रार उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली.