आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Election Commission Of India , Divya Marathi

‘त्या’ 15 मिनिटांमध्ये झाले नाही मतदान केंद्रावर मॉक पोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून मॉक पोलची नोंद केली आहे. या माध्यमातून मुक्त व नि:पक्ष वातावरणात मतदान होण्यास प्रोत्साहन देण्यात येते. पण, याकडेच दुर्लक्ष झाल्याची माहिती प्रत्यक्ष मतदान केंद्रांची पाहणी केल्यावर लक्षात आली. मॉक पोलची माहिती ना उमेदवारांच्या प्रतिनिधींना होती, ना अधिकार्‍यांना, त्यामुळे अनेक ठिकाणी मॉक पोल झालेच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मतदानाच्या दिवशी सकाळी मॉक पोल घेण्यात येते. हे मॉक पोल म्हणजे मतदानाची रंगीत तालीम असते. त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची तपासणी केली जाते. त्या योग्य प्रकारे काम करतात की नाही, याची पाहणी उमेदवार किंवा पक्षाचे प्रतिनिधी अर्थात पोलिंग एजंट समोर करण्यात येते. शहरातील काही मतदान केंद्रांची आज सकाळी पाहणी केली असता मॉक पोल काय सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियाच सुरू नव्हती. त्यामुळे काही ठिकाणी मतदात्यांनी काढता पाय घेतला होता.
मॉक पोलचा घोळ
प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 6.45 वाजता मॉक पोल करण्याची गरज होती. पण, पोलिंग एजंट अर्थात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधीसमोर मॉक पोल केले नसल्याची माहिती मिळाली. अनेक केंद्रांवर तर पोलिंग एजंटला मॉक पोल काय असते, याची माहितीदेखील नव्हती. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे मतदानाची रंगीत तालीम झाली नसल्याची माहिती दिली. त्यामुळे मॉक पोलच न झाल्याने ईव्हीएम तपासणी झाली काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
मॉक पोलची गरज का
मॉक पोल हे मतदान प्रक्रियेत पहिले होणारे मतदान आहे. याची गणना नसते. मॉक पोलनंतर ईव्हीएममधील नोंदी अधिकारी नाहीसे करतो. या माध्यमातून यंत्र सुरू आहेत की नाही, याच्या तपासणीसाठी ही मॉक पोल असते. ईव्हीएमद्वारे मताची योग्य नोंदणी होत आहे की नाही, यासाठी हे मॉक पोल करण्यात येते.
अधिकारी ईव्हीएम करतात झिरो
मॉक पोल सकाळी झाल्यानंतर त्यावर झालेल्या मतदानाच्या नोंदी हा पूर्णपणे डीलिट अर्थात नाहीसे करण्यात येतात. त्यामुळे ईव्हीएमवर झालेल्या नोंदी नष्ट केल्यानंतर प्रत्यक्षातील मतदान घेण्यात येते. त्यानंतर या मॉक पोलसंबंधीचा अर्ज भरण्यात येतो, यात अधिकारी हे कोणासमोर मॉक पोल केले, याची माहिती लिहितात. तसे नसल्याच इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मॉक पोल केल्याची नोंद करतात.
साहेब, उशिरा उठले हो.!
मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरू होण्याची गरज होती. पण, आज अनेक ठिकाणी ही प्रक्रिया 7 वाजता सुरू झाली नाही. त्यामुळे मतदार निराश झाले. या प्रक्रियेत अधिकार्‍यांना सकाळी घाम फुटला होता. मतदानासाठी आलेल्या मतदारांनी या अधिकार्‍यांना खडसावल्यानंतर त्यांनी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेत अनेक मतदारांना वंचित राहावे लागले, अशी तक्रार राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी केली.
सर्वच ठिकाणी मॉक पोल
मॉक पोल सर्वच ठिकाणी घेण्यात आला आहे. तसा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. नेमक्या किती ठिकाणी झाला, याची माहिती देऊ शकत नाही.’’ उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक),अकोला.