आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 10 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीमध्ये मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणुकीचा दिवस कुणीही न विसरता मतदानाचा हक्क बजावावा’, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले आहे.
गुरुवार, 6 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 1 जानेवारी 2014 रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण 16 लक्ष 40 हजार 305 मतदार सद्य:स्थितीत आहेत. ऑक्टोबर 2013 ते 15 जानेवारी 2014 या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी, अपात्र, दुबार, मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रत्येक मतदाराने त्याचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे खात्रीपूर्वक तपासावे. मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांची नावे नोंदवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता 9 मार्च 2014 रोजी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करून मतदारांना त्यांचे नाव नोंदवण्यासाठी नमुना क्र. 6, 7, 8, 8 अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. मतदार नोंदणी अधिकारी असे अर्ज सादर करणार्‍या मतदारांबाबत 20 मार्चपूर्वी अंतिम निर्णय घेतील. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता गट पातळीच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यानुषंगाने 6 मार्चला विविध राजकीय पक्षांचे जिल्हास्तरीय अध्यक्ष तसेच कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन माहिती देण्यात आली आहे. या पत्रपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, पोलिस उपअधीक्षक निकेश खाटमोडे, निवडणूक विभाग प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.
‘पेड न्यूज’वर राहणार ‘वॉच’
विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणार्‍या ‘पेड न्यूज’वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी’चे गठन केले आहे. करणार्‍या मतदारांबाबत 20 मार्चपूर्वी अंतिम निर्णय घेतील. त्यानंतरच या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता गट पातळीच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यानुषंगाने गुरुवारी, 6 मार्चला विविध राजकीय पक्षांचे जिल्हास्तरीय अध्यक्ष तसेच कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात झालेल्या या पत्रपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, पोलिस उपअधीक्षक निकेश खाटमोडे, निवडणूक विभाग प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.
आचारसंहितेचे पालन करावे
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार बुधवार, 5 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा निबंधक सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांना सेवेतील वाहने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय याअंतर्गत पदाधिकार्‍यांकरिता असलेल्या सभागृहात कुठल्याही प्रकारे आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.