आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अमेझिंग लोणार..ओऽऽ इट्स व्हेरी नाइस!’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - जैवविविधते सोबतच सांस्कृतिकदृष्ट्या मोठा ठेवा असलेल्या लोणार सरोवर व त्याच्या काठावरील पौराणिक मंदिरांची, वास्तूंची पाहणी केल्यानंतर कॅनडामधून आलेल्या डॉ. डॉमनिक लेपॉइंट आणि डॉ. प्राक्वॉइस बेडार्ड या दोन पर्यटन प्रतिनिधींच्या तोंडून, ‘अमेझिंग लोणार..ओ इट्स व्हेरी नाइस!’,असे भावोद्गार निघाले.
जागतिक वारसा म्हणून सरोवराची ओळख व्हावी, चांगल्या दर्जाचे पर्यटनस्थळ येथे विकसित व्हावे, या दृष्टिकोनातून सरोवराचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी हे कॅनडाचे दोन सदस्यीय पथक दोन दिवसांपासून येथे आले आहे. त्यांच्या पाहणीनंतर केंद्र सरकार व कॅनडाला ते त्याबाबतचा अहवाल देणार आहेत. त्यानुषंगाने या दोन सदस्यीय पथकाने बुधवारी दिवसभर सरोवरात उतरून येथील जैवविविधता, पुरातन वास्तू, मंदिरे, सरोवरकाठावरील मंदिरांची पाहणी केली. सरोवराचा निसर्गरम्य परिसर व मंदिरावरील हेमाडपंथी कोरीव काम पाहून त्यांच्या तोंडून हे उद्गार निघाले. त्यांच्या समवेत पर्यटन विभागाचे मुंबई, अमरावती आणि औरंगाबाद येथील अधिकारीही होते.
(फोटो - कॅनडाच्या पर्यटन प्रतिनिधींनी बुधवारी लोणार सरोवराची पाहणी केली.)