आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत कराचा भरणा करा; अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, पाटबंधारे विभागाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कोट्यवधींचाकर थकीत असल्याने शहराचा पाणीपुरवठा २५ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय अकोला पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यामुळे अकोलेकरांवर पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

महापालिकेला सुमारे १४.४९ हजार लाख लिटर पाण्याची गरज भासते. काटेपूर्णा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने कर भरला नसल्यामुळे पाटंबधारे विभागाने कर भरण्याबाबत ताकीद दिली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत कराची रक्कम भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पाण्याबाबतविशेष सभा : जिल्हापरिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत चर्चा घडवून आणण्याकरिता १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत विशेष सभेचे आयोजन दुपारी वाजता केले आहे. या सभेला जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेला पेच
कराचाभरणा करण्यासाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न मनपा प्रशासनाला पडला आहे. २५ पूर्वी भरणा केला नाही तर पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.

अकोट ८४ खेडी योजनेचाही प्रश्न गंभीर
अकोट८४ खेडी योजना जिल्हा परिषद प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अकोला विभागाला २० मे २०१४ रोजीच दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेत पार पडलेल्या बैठकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई अन्य पदािधकाऱ्यांनी केलेल्या िवनंतीवरून जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांनी जिल्हा परिषदेला निर्णयाकरिता १५ नोव्हंेबर तारीख दिली होती. मात्र, अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाने पैशाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे १४ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यत जिल्हा परिषदेने निर्णय कळवल्यास अकोट ८४ खेडी योजनेंतर्गत अकोला, मूर्तिजापूर अकोट तालुक्यातील गावांना जीवन प्राधिकरणमार्फत होणारा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत असलेल्या दीडशे गावांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.