आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लांब पल्ल्याच्या मार्गाने लाखोंच्या उत्पन्नावर पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळ आगारातून लांब पल्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने सोडण्यात येत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम पडत आहे. ज्या जवळच्या मार्गातून उत्पन्न प्राप्त होते. त्याकडे एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यानी दुर्लक्ष केले आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न तर बुडतेच शिवाय वर्दळीच्या मार्गावर बसेस नसल्याने प्रवाशांची गैरसोयही होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सध्या कानाकोपर्‍यात एसटी बस जात आहे. यामुळे प्रवाशांची होणारी पायपीट थांबली आहे. मात्र, अनेकवेळा बस अवेळी येणे, तसेच आगारात बस नसणे हा प्रकार वाढला आहे. यामुळेच प्रवाशांना तासन्तास बसस्थानकात बसून राहावे लागते. यवतमाळ शहरातून धामणगावसाठी जाणार्‍या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते. यासाठी प्रत्येक अर्ध्यातासाला बसफेरीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा एकही फेरी वेळेवर येत नाही. चौकशी केंद्रात गेल्यानंतर केवळ बसची वेळ सांगण्यात येते. त्यामुळे बसची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय प्रवाशांजवळ नसतो. दरम्यान, गुरूवारी यवतमाळ आगारातून मोठ्या प्रमाणात लांब पल्याच्या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवार, 27 जून रोजी बस वेळेवर आल्याच नाही.

या प्रकारानंतर वाहन परिषद आणि कामगिर नियोजनमधील असमन्वय दिसून आला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळातील संघटनाचे प्रतिनिधींनी लांब पल्याच्या मार्गावर बस पाठविण्यास विरोध दर्शविला आहे. या विरोधाला न जुमानता हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकार्‍याचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी एसटीचे उत्पन्न मात्र बुडत आहे. धामणगाव, घाटंजी आणि आर्णी, महागामार्गावर सर्वांत जास्त उत्पन्न प्राप्त होते. या मार्गावर जास्तीच्या बस सोडण्यापेक्षा लांब पल्याच्या मार्गावरच अतिरिक्त बस सोडण्यात येत आहे. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
15 नवीन बस वळवल्या मराठवाड्याकडे
यवतमाळ आगारासाठी शासनस्तरावरून ‘लेलँन्ड’ कंपनीच्या 15 नविन बस पाठविण्यात आल्या होत्या. यवतमाळ आगाराकडील संपूर्ण बस ‘टाटा’ कंपनीच्या आहेत. त्यामुळे नविन आलेल्या 15 ही बस मराठवड्याकडे वळविण्यात आल्या. यासंदर्भात अधिकार्‍याना विचारणा केली तर, ‘लेलँन्ड’ कंपनीचे स्टोअर कुठून उघडायचे असा प्रती प्रश्न केल्या जात आहे. केवळ स्टोअर उघडण्यासाठी नविन बस मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय आता चुकीचा ठरल्याची प्रतिक्रीया अधिकारी देत आहेत.
उरफाटा न्याय : ज्या मार्गातून उत्पन्न मिळते त्या मार्गावर जास्त बसेस सोडल्या पाहिजेत असा साधा व्यावहारिक नियम आहे. मात्र यवतमाळ आगारात त्याला फाटा देण्यात आला आहे. परिणामी प्रवासी तर त्रस्त आहेतच दुसरीकडे लांब पल्याने उत्पन्नही मिळेनासे झाले आहे.
भंगार बसचा वादही चव्हाट्यावर
यवतमाळ आगाराकडे सध्या 426 बसेस आहेत. त्याचप्रमाणे मानव विकास मिशनच्यासुद्धा 45 बस आलेल्या आहेत. मात्र, या बसची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. भंगार बस घेऊन चालक गेल्यानंतर परतीच्या मार्गावरच ती बंद पडते. यामुळे प्रवाशांसह एसटीच्या चालक, वाहकाचीसुद्धा गैरसोय होत आहे. चांगल्या बस मिळाव्या म्हणून संघटनेच्या वतीने वारंवार महामंडळाच्या अधिकार्‍याकडे धाव घेण्यात आली, परंतु याचा उपयोग झाला नाही. प्रत्येकवेळी हा वाद पुढे येतो.
आगारालाच नको आहे उत्पन्न
जिल्ह्यातील घाटंजी मार्ग हा सर्वांधिक उत्पन्न प्राप्त करून देवू शकतो. त्या अनुषंगाने फेर्‍याही आहेत, परंतु वेळेचे नियोजन नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. मात्र, वेळेचे नियोजन करून सुरळीत बस करू याशिवाय कुणीही काहीच बोलत नाही. आगारालाच उत्पन्न नको असे दिसते.’’
विकास विरदंडे, प्रवासी, घाटंजी.
तक्रारीचा निपटाराच नाही
सध्या यवतमाळ आगाराकडे ज्या बसेस उपलब्ध आहेत. त्यात सर्वांधिक बस भंगार आणि नादूरूस्त अशा आहेत. तरीसुद्धा चालक, वाहकांना ह्या बस घेऊन जाण्याची वेळ येते. यासंदर्भात मी स्वत: अधिकार्‍याना भेटलो तोडगा निघाला नाही.’’
बंडू गाडगे, जिल्हाध्यक्ष, मनकासे, यवतमाळ.