अकोला- फॅशनजगतात सतत नवनवीन बदल होत असतात. काही नवीन डिझाइन लाँच होतात, तर कधी जुन्या पॅटर्नचा थोडा लूक बदलून त्याला परत फॅशनमध्ये आणले जाते. असेच आऊट ऑफ फॅशन असलेले स्कर्ट आता फॅशनच्या दुनियेत परतले आहे. सध्या तरुणींमध्ये स्कर्टची चलती दिसून येत असून, लाँग स्कर्टनी तरुणींना भुरळ घातली आहे.
बॉलिवूड आणि फॅशनचा जवळचा संबंध आहे. चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी परिधान केलेल्या कोणत्याही ड्रेसला फॅशनचा भाग व्हायला फारसा वेळ लागत नाही. एखाद्या चित्रपटात अभिनेत्रीने वापरलेले दागिने, ड्रेस यांची तरुणींमध्ये नेहमी चर्चा असते. आजही गाजत असलेला आशिकी-२ या चित्रपटात श्रद्धा कपूर, हंसी तो फसी आणि दावत-ए-इश्क या चित्रपटात
परिणीती चोप्रा यांनी घातलेले लाँग स्कर्ट परत एकदा फॅशनमध्ये आले आहेत. विविध फॅब्रिकमधील हे स्कर्ट सध्या तरुणींच्या फॅशनचा भाग झाले आहे.
कॉटन, शिफॉन, जॉर्जेट, नेट, क्रेप अशा विविध फायब्रिकमधील स्कर्ट पसंतीस उतरत आहे. यात प्रिंटेंड, प्लेन रंगातील लाँग स्कर्टला अधिक मागणी आहे. धाग्यांचे वर्क, कुंदन, मोती किंवा काचेचे वर्क केलेल्या स्कर्टलादेखील आकर्षित करत आहेत. ब्लॅक, ब्ल्यू, व्हाइट, रेड या रंगांना तरुणींची पहिली पसंती मिळत आहे. ब्लॅक किंवा रेड रंगासोबत गोल्डन, कॉपर रंगातील जाड प्लेन बॉर्डर असलेल्या स्कर्टचे विशेष आकर्षण पाहायला मिळते. यासोबतच डार्क, लाइट रंगाचे कॉम्बिनेशनदेखील भुरळ घालत अाहेत. लाँग स्कर्ट हे जवळपास ४० ते ४२ सेंटिमीटर लांब असून, ५०० ते २००० रुपयांपर्यंत स्कर्टला मागणी आहे.