आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Loss Serve Starts From Revenue Department In Akola

पावसाने झालेल्या नुकसानीचा महसूल विभागातर्फे सर्व्हे सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. बाळापूर पातुरात सर्वाधिक, तर अकोला, मूर्तिजापूर, अकोट तेल्हारा तालुक्यात काहीअंशी नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने दिली.

३१ डिसेंबर, जानेवारीला झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. बाळापूर, पातूर तालुक्यात झालेल्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. वाडेगाव येथे लिंबू संत्र्याचे नुकसान झाले, तर पातूर तालुक्यात हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे वाशीमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे.

पंचनाम्याचे काम सुरू
^अकोला तालुक्यातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. पंचनामे केल्यानंतर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल.'' संतोषिशंदे, तहसीलदार,अकोला
नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके
नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आली आहेत. पटवारी आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानीचा सर्व्हे करत आहेत. पंचनामे करून अहवाल स्वरूपात तहसीलदारांकडे सादर केले जातील.