आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्यांची आवक वाढली; भावात स्थिरता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अवेळी झालेल्या पावसाने भाज्यांची आवक मंदावली होती. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला. दोन दिवसांपूर्वी आवक कमी झाल्याने भावदेखील वाढले होते, परंतु आता बाजाराची स्थिती स्थिरावते आहे. ढगाळ वातावरणानंतर आता सूर्यदर्शन होऊ लागल्याने बाजाराची स्थितीही स्पष्ट होऊ लागली आहे. फुलांची आवकही आता चांगली आहे.
३१ डिसेंबर आणि जानेवारीला राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झाला. शेतात पाणी साचल्यामुळे भाज्यांची काढणी झाल्याने अकोला बाजारात बाहेरून येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली होती. ठोक बाजारातच भाज्या आल्याने किरकोळ बाजारात भाज्या मिळाल्या नाहीत. शनिवारपासून मात्र स्थिती सुधारते आहे. रविवारीही भाज्या मुबलक प्रमाणात आल्या होत्या. मात्र, काही भाज्यांचे दर चढे होते.

पत्ताकोबी, फुलकोबी, वांगे, गाजर, पालक, शेपू ३० रुपये किलो, कांदे-बटाटे २० रुपये किलो, काकडी, कोथिंबीर ४० रु. किलो, वाल, भेंडी, मिरची ६० रु. किलो, तुरई ६० रुपये किलो, मटर ५० रु. किलो, लसूण, आले ८० रु. किलोप्रमाणे विकले जात आहे. मेथीची बाजारात चांगली आवक झाल्याने ठोक बाजारात तर मेथी १० रुपये किलो दराने विकली गेली.