आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहेब, माझ्या प्रेयसीला लवकर सोडवा हो' आठ दिवस ठेवले होते डांबून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-‘लग्नकरेन तर जयसोबतच...मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही’, असे म्हणणा-या किरणच्या प्रेमसंबंधाची चाहूल तिच्या आईवडिलांना लागली. या प्रेमाला कडाडून विरोध असलेल्या आईवडिलांनी तिचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क तोडला आणि आठ दिवस तिला घरातच डांबून ठेवले.
एक दिवस तिने आईवडिलांच्या लपून जयला फोन केला. घडलेली सर्व आपबिती सांगितली. त्यामुळे जय बैचेन झाला, अन् तो पोहोचला थेट पोलिस ठाण्यात. ‘साहेब, माझ्या प्रेयसीला लवकर सोडवा हो, नाही तर ती जीवाचं काही तरी करेल’, अशी आर्त विनवणी त्याने पोलिसांकडे केली.
किरण २० वर्षांची आहे आणि जय २२ वर्षांचा. अकरा महिन्यांपासून संपर्कात आलेले दोघेही लग्नाच्या आणाभाका घेत प्रेमरंगात रंगले. मात्र, आपल्या प्रेमाला होणा-या विरोधाला जुमानेल ती किरण कसली. जय हा शासकीय रुग्णालयातच नोकरी करतो. किरणच्या प्रेमाची चाहूल तिच्या घरच्यांना लागल्यानंतर प्रथम तिची आई आणि नंतर तिच्या आजीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ती समजण्यापलीकडे गेल्यामुळे त्यांनी तिला घरात डांबले. चक्क आठ दिवस तिला बाहेर पडू दिले नाही. तिचा मोबाइलही त्यांनी घेतला. मात्र, गुरुवारी तिने जयला चोरून फोन केला आणि ‘मला घरात डांबले, मला सोडव’, अशी आर्जव केली. जय बैचेन झाला. त्याने सिटी कोतवाली पोिलस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार केली. पोिलसांनी तक्रार घेत महिला कॉन्स्टेबलला तिच्या घरी पाठवले आणि त्या मुलीला पोलिस ठाण्यात आणले. ‘मी सज्ञान आहे, माझ्या मर्जीने मी कुणासोबतही लग्न करू शकते’, असे म्हटल्याने पोलिसांचे हात टेकले. पाठोपाठ ठाण्यात किरणची आई, नातेवाईक आले. आम्हाला तक्रार करायची नाही, असे म्हणून निघून गेले, मुलीने काही बरेवाईट केल्यापेक्षा तिचा निर्णय तिला घेऊ द्या, असे म्हणूने ते घरी निघून गेले. प्रेमीयुगुल मात्र दिवसभर पोिलस ठाण्यात बसून होते.