अकोला/अमळनेर- शेगाव येथील लॉजवर प्रेमीयुगुलाने विषारी द्रव्य सेवन केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर आहे. तरुणी अंतुर्ली येथील असून तिचे १६ मेस लग्न होते.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील २१ वर्षीय तरुणीचे गावातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मनोहर मुरलीधर पाटील (वय २१) याच्याशी प्रेम होते. युवती मे रोजी घरून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर मे रोजी मारवड पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. दोघे मे रोजी रात्री शेगाव येथे संत श्री गजानन महाराज दर्शनासाठी आले. दर्शन घेतल्यानंतर रात्री श्रीराम रेस्ट हाऊस येथे निवासाकरिता थांबले.
सकाळ होऊनही हे दांपत्य उठल्याने लॉजमालक नाझीरखान यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडला असता दोघांनीही विष प्राशन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना त्वरित सईबाई मोटे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी रवाना केले. अकोला येथे मनोहर मुरलीधर पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अग्रवाल हे रेस्ट हाऊसला दाखल झाले. त्यांनी रूमची झडती घेतली असता, वह्या पुस्तके मिळून आले.
तरुणीच्या विवाहाची तयारी
तरुणीचा १६ मे रोजी असलेल्या विवाहाची तयारी चालली होती. त्यातच ती बेपत्ता झाल्याने कुटुंब चिंतेत होते. शनिवारी शेगाव पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर कुटुंब शेगावकडे रवाना झाले