आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाअभावी जिल्ह्यामध्ये घटला उडीद-मुगाचा पेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दरवर्षी नागपंचमीला शेतकरी मोठय़ा प्रमाणात नवा मूग आणि नंतर उडीद विक्रीसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात. मात्र यावेळी पावसाअभावी जिल्ह्यात विपरित परिस्थिती दिसत आहे. मुळातच मुगाचा पेरा केवळ 26 तर उडीदाचा पेरा 15 टक्केच झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान तर झालेच आहे.
त्याचा परिणाम जिल्ह्यामधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नावर होत आहे. मालाची आवक नसल्यामुळे शुकशुकाट दिसत असून बाजार समित्यांचे जवळपास 50 लाखापर्यंत उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात 13904 हेक्टर क्षेत्रावर मुगाचा पेरा होतो. तो यावेळी फक्त 26 टक्के झाला. उडीदाचा पेरा 7285 हेक्टर क्षेत्रावर होतो. तो फक्त 15 टक्के झाला. तुरीचे पीक 44666 हेक्टरवर घेतल्या जाते. यावेळी 69 टक्के पेरा झाला आहे. त्याचा परिणाम 13 बाजार समित्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर झाला आहे. खामगावची बाजार समिती सर्वात मोठी आहे. तर देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर या बाजार समितीमध्ये मूगाची आवक तीन हजार क्विंटल पर्यंत होते. जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यंत मूग खरेदीला वेग आलेला असतो. त्यानंतर उडीदाची खरेदी नाफेड मार्फत सुरु होते.
गतवर्षी जिल्ह्यात 305.50 क्विंटल उडीदाची खरेदी नाफेडने केली होती. शेगाव, चिखलीत 305 क्विंटल खरेदी : गतवर्षी उडीदाची खरेदी जिल्ह्यात करण्यात आली. 8 क्विंटल 39 किलो खरेदी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, शेगाव येथे 297 तर चिखली येथे 8.49 क्विंटल खरेदी झाली होती.
15 ते 20 हजारांचा फटका
- मुगाची आवकच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्याप झाली नाही. मलकापूर भागात दरवर्षी एकरी मुगाचा पेरा लक्षात घेतला, तरी समितीला 15 ते 20 हजार रुपये मिळतात. यावर्षी नवा मूगच न आल्यामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे.’’ मोहन राणे, सचिव कृउबास मलकापूर
20 टक्के उत्पन्न घटणार
पावसाने मारलेली दडी व त्यानंतरही झालेल्या अपुर्‍या पावसामुळे मेहकर परिसरात मूग व उडीदाची पेरणीच झालेली दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी होणार्‍या उत्पन्नाएवढे उत्पन्न मिळणार नाही. 20 टक्के उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.’’ र्शीकृष्ण बंगाळे, सचिव बाजार समिती मेहकर
4300 रुपयांचा भाव
गतवर्षी उडीदाला व तुरीला शासकीय आधारभूत किंमत मिळाली होती. 4,300 रुपये असा भाव देण्यात आला होता. बारदान्याअभावी खरेदी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. यावर्षी उडीद अजून बाजारात आलाच नाही. उडीद, मुगाच्या शेंगाही लोकांना दिसल्या नाही.
पेराच नाही उत्पन्न कसे होणार
सुरुवातीच्या काळात पावसाने दीड महिना दडी मारल्यामुळे यंदा मूग व उडीदाचा पेरा सिंदखेडराजा भागात झाला नाही. शेतकर्‍यांनीसुद्धा पावसाअभावी पेरणीकडे धाडस केले नाही. त्यामळे बाजार समितीला उत्पन्न होणार नाही.’’ हरिभाऊ कोल्हे, सचिव सिंदखेडराजा कृउबास
लोणारचे नुकसान
यंदा मुगाचा पेरा लोणार भागात झाला नाही. त्यामुळे यावेळी उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे.मागील वर्षी 4 लाख 79 हजार 95 रुपयांचे उत्पन्न झाले होते.’’ विजय मापारी, सभापती
उडीद खरेदीला वेळ आहे
गतवर्षी ज्या पद्धतीने उडीद खरेदी करण्यात आली होती. त्यानुसार नाफेडच्या वतीने यावेळीही खरेदी करण्यात येईल, अजून खरेदीची वेळ निश्चित करण्यात आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
बाजार समित्यांचे 42 कोटींची देयके थकित
गतवर्षी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत नाफेडच्या वतीने उडीदाची खरेदी क रण्यात आली होती. तूरचीही खरेदी झाली. जवळपास 41.60 कोटी रुपयांची ही खरेदी झाली होती. या खरेदीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीला 1.02 टक्के कमिशन मिळते. हे कमिशन अजूनही कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाले नाही.