आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीनं धावले पाय; अंध, अल्पदृष्टी मुलांची मॅरेथॉन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जेसीआयअकोला न्यू प्रियदर्शनीच्या वतीने अंध अल्पदृष्टी मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले. तीनशे मीटरच्या या स्पर्धेत कन्नुभाई वोरा अंध विद्यालयातील ५० विद्यार्थी धावले. यात प्रशांत पाखरे याने बाजी मारली. तर, गणेश मोहे द्वितीय आणि जय बाहाकार तृतीय स्थानावर आले.

सकाळी गोरक्षण मार्गावरील बुलडाणा अर्बन बँकपासून स्पर्धेला सुरुवात झाली. महापालिका उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी हिरवी झेंडी दाखवली. बँकेपासून धावण्याला सुरुवात करून नेहरू पार्क चौकात त्याचा समारोप झाला. या मुलांना धावताना अडचण येऊ नये म्हणून प्रत्येकासोबत एक-एक सहायक विद्यार्थी होते. नथमल गोयनका विधी महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रतिनिधी आकाश हेडा, लरातो वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय सुर्वे, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी संपदा सोनटक्के आणि लरातो वाणिज्य महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती माहेश्वरी यांनी सहायक विद्यार्थी देण्यासाठी पुढाकार घेतला. तर, आरडीजी महाविद्यालयातील प्रा. विद्या ठाकरे, दीप्ती जोशी, नीलिमा पाटील, शिवानी नाकाडे यांनी सहकार्य केले.
नेहरू पार्क चौकात स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या वेळी प्रथम आलेल्या प्रशांत पाखरे याला ११०० रुपये रोख, द्वितीय गणेश मोहे याला ७०० रुपये रोख तृतीय जय बाहाकार याला ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. या वेळी बीजीए सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक अजय सेंगर, जेसीआयचे माजी विभागीय उपाध्यक्ष दामोदर सारडा, अंध विद्यालयातील शिक्षक विजय सोनकर, मनोज चांडक, नेहरू पार्कचे संचालक बी. एस. देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल भट्टड यांनी, तर अाभार सचिव चंदा राठी यांनी केले.
या वेळी अध्यक्षा वंदना राठी, प्रीती मालू, राखी गांधी, कविता मालू, रूपा हेडा, वर्षा पालडीवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जेसीआय अकोला न्यू प्रियदर्शनीच्या वतीने अंध अल्पदृष्टी मुलांसाठी आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक.