आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम सिलिंडर टंचाईचे चटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरासह जिल्हय़ाला सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईचे चटके नागरिकांना बसत आहेत. बुकिंग करू न आणि पैसे देऊनही नागरिकांना दिवसभर सिलिंडरसाठी ताटकाळत उभे राहावे लागत आहे. सण, उत्सवाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. याकडे जिल्हा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ऑनलाइन सिलिंडर बुकिंग सुरू झाल्यानंतर शहरात सिलिंडरसाठी नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. सर्व कामे बाजूला ठेवून त्यांना संबंधित गॅस एजन्सीकडे दिवस दिवसभर ताटकाळत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. काही दिवसांपूर्वी शहरात सिलिंडरसाठी हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस संरक्षणात सिलिंडरची विक्री एजन्सीला करावी लागत होती. या प्रकाराला संबंधित संचालक दोषी असल्याचा आरोप करण्यात आला होता. शहरात सिलिंडरची अवैध विक्री होत आहे. 460 रुपयांना मिळणारे सिलिंडर अवैधरीत्या 600 ते 700 रुपयांना विकले जात आहे.

ऑनलाइन बुकिंग केलेल्यांना करतात मात्र त्यांना सिलिंडरसाठी वाट बघावी लागत आहे. व्यावसायिकाकंडून अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना सिलिंडर देण्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यात जिल्हा पुरवठा विभाग अपयशी ठरले आहे.

नागरिकांना दिलासा
शासनाने ऑनलाइन बुकिंग केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरात कुठेही सिलिंडरचा काळा बाजार होणार नाही यांची दक्षता घेतली जात आहे. या प्रकाराबाबत तक्रारी आल्यास निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे.’’ अनिल शिंदे, अन्न धान्य अधिकारी, अकोला

ग्राहकांना अपमानास्पद वागणूक
शहरातील काही गॅस एजन्सीमधील कर्मचारी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. यासंदर्भात अनेकदा जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. जास्त पैसे मोजणार्‍यांना चांगली सेवा दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.